शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आज मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा

By admin | Updated: September 25, 2016 02:49 IST

राज्यभर सुरू असलेला मराठ्यांचा झंझावात रविवारी यवतमाळात धडकणार आहे.

तीन लाखांच्या गर्दीचा पोलिसांचा अंदाजयवतमाळ : राज्यभर सुरू असलेला मराठ्यांचा झंझावात रविवारी यवतमाळात धडकणार आहे. मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चासाठी यवतमाळ सज्ज झाले असून दुपारी १२ वाजता पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. लाखो समाजबांधवांची उपस्थिती राहणार असल्याने या मोर्चाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून या मोर्चाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अ‍ॅट्रोसिटीमधील बदल, मराठा समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी मराठा-कुणबी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजतापासून पोस्टल मैदानावर मोर्चेकऱ्यांना प्रवेश करता येणार आहे. पोस्टल ग्राऊंडमध्ये पुरुष, महिला असे स्वतंत्र कक्ष राहणार आहे. येथे चार वैद्यकीय पथकही राहतील.पोस्टल मैदानावर उभारलेल्या स्टेजवर दहा युवती राहतील. येथे सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेतली जाईल. उरी हल्ल्यातील शहीद आणि देशभरात अत्याचाराने प्राण गमवावा लागलेल्या तरुणींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर प्रा.प्रवीण देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे. संचालन कैलास राऊत करतील. मोर्चाला प्रारंभ होईल तेव्हा सुरुवातीला युवती, त्यामागे महिला, युवक आणि इतर समाज असा क्रम राहणार आहे. आठच्या संख्येने मोर्चेकरी मार्गक्रमण करतील. दोन हजार स्वयंसेवकांचे त्याला संरक्षण राहील. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.मोर्चाचा समारोप एलआयसी चौकात होणार असून त्या ठिकाणी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रम १२ मिनिटांचा असून तेथून काही युवती मार्गदर्शन करतील, तर त्याचवेळात काही युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता होणार आहे. १२ अ‍ॅम्ब्युलन्स, चार ध्वनिक्षेपक रिक्षा आणि १०० ध्वनिक्षेपक या मोर्चात राहणार आहे. त्यावरून मोर्चेकऱ्यांना सूचना दिल्या जातील. (शहर वार्ताहर)एक लाख झेंडेमराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चात सहभागी नागरिकांच्या हातात भगवे ध्वज राहणार आहे. सुमारे एक लाख ध्वज या मोर्चेकऱ्यांच्या हाती राहणार असून ५० हजार फलक घेतलेले नागरिक सहभागी होतील.तगडा पोलीस बंदोबस्तमराठा-कुणबी समाज मोर्चामध्ये तीन लाखांची किमान गर्दी होण्याचा अंदाज बांधून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.