शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘तंबाखूमुक्त शाळा’ घोषणेचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व सलाम बाँम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान ...

ठळक मुद्देशिक्षकच खर्ऱ्याच्या अधीन : पांढरकवडा तालुक्यातील १३६ शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व सलाम बाँम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पांढरकवडा पंचायत समितीमधील १३६ शाळांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी सावित्रीबाई फुले यांचे जयंतीदिनी झालेल्या एका कार्यक्रमात तत्कालीन पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखूचे सेवन न करण्याची शपथही घ्यायला लावली. तसे आदेशही काढण्यात आले. शाळांसमोर बोर्डही लावण्यात आले. परंतु बोर्ड केवळ नावापुरतेच अहे. काही विद्यार्थीही शाळेत सर्रासपणे तंबाखू, गुटखा व खर्ऱ्याचे सेवन करीत असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील शाळांमध्ये पाहावयास मिळते. प्रशासनाचा आदेश मिळाल्यानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणीदेखिल केली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनाही समजावून सांगण्यात आले. पंरतु शाळेतील काही कर्मचारीच विद्यार्थ्यांसमक्ष तोंडात खर्रा कोंबताना दिसतात. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागात जनजागृतीची गरजकेवळ तंबाखूमुक्त शाळा झाल्याची घोषणा करून तंबाखूमुक्त शाळा होणार नाही, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. शासनाने अनेकदा आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.