शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

थकीत कर्जासाठी चौघांचा नेरमध्ये शेतकऱ्यावर हल्ला

By admin | Updated: February 28, 2016 02:27 IST

खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले.

महिंद्रा फायनान्स कंपनी : वसुली करणाऱ्या चौघांचे कृत्य नेर : खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. या कंपनीच्या चार प्रतिनिधींनी शेतकऱ्याला शनिवारी दुपारी गंभीर मारहाण केली. तालुक्यातील टाकळी (सलामी) येथील शेतकरी दिनेश हिम्मतराव चौधरी (३६) यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांनी यवतमाळ येथील महिंद्रा फायनान्सकडून १ लाख १० हजार रुपये कर्ज घेतले होते. कंपनीने त्यापैकी केवळ ७५ हजार रुपयेच दिले. मात्र कर्जाचा भरणा सुरू करण्यास बजावले. सदर शेतकऱ्याने आधी उर्वरित ३५ हजार रुपये द्या, अशी मागणी केली. परंतु उर्वरित रक्कम काही शेतकऱ्याला मिळाली नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी दिनेश चौधरी यांना फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने एका कार्यालयात बोलाविले. तिकडे जात असताना आजंती रोडवरील एका पुलाजवळ त्यांना थांबवून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेतकरी तेथेच बेशुद्ध पडला. नेर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून शेतकऱ्याला यवतमाळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सदर शेतकऱ्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात संपूर्ण घटनाक्रम सांगितला. वृत्त लिहेपर्यंत या घटनेबाबत गुन्हा नोंद झालेला नव्हता. सध्या खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहे. हा प्रकार न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी गोपाल चव्हाण यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)