शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्याची क्षमता चारच वाघांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 21:44 IST

पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली.

ठळक मुद्देप्रत्यक्षात डझनावर वाघांचे वास्तव्य : जंगलक्षेत्र कमी पडत असल्यानेच गावांमध्ये शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे.नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली. म्हणून या वाघिणीला हैदराबादच्या नवाब या एक्सपर्ट शिकाऱ्यामार्फत गोळी घालून ठार मारण्यात आले. या निमित्ताने व्याघ्र संख्या व अभयारण्याची क्षमता हा मुद्दा पुढे आला आहे.सूत्रानुसार, पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाºया टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १४८.६३ चौरस किलोमीटर एवढे आहे. या अभयारण्यात जास्तीत जास्त चार ते पाच वाघ राहू शकतात. प्रत्येक वाघाला किमान १० चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. हे क्षेत्र वाघ स्वत: निश्चित करते. या क्षेत्राच्या चहूबाजूला तो लघवीने सीमा ठरवितो. मग त्या सीमेत दुसरा वाघ प्रवेश करीत नाही. अवघ्या चार ते पाच वाघांची क्षमता असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये नऊ ते दहा वाघ असल्याची नोंद वन खात्याच्या दप्तरी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या भागातील वाघांचा हा आकडा १३ ते १४ असल्याचे वन यंत्रणा खासगीत सांगते. क्षमतेच्या सुमारे तीन पट अधिक वाघ असल्याने टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र या वाघांना कमी पडते. त्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर आले असून पांढरकवडा वन विभागाचे जंगल तसेच त्याला लागून असलेल्या रहिवासी वस्त्या-गावे आणि शेतशिवारांमध्ये या वाघांचा वावर वाढला आहे. त्यातच शिकारीसाठी वन्यप्राणी मिळत नसल्याने हे वाघ हिंसक झाले असून मानवी वस्त्यांवर हल्ले करू लागले आहे. वाघांनी केलेल्या हल्ल्यात पांढरकवडा वन क्षेत्रांतर्गत आतापर्यंत १३ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला आहे. मात्र या सर्व १३ शिकारी एकाच वाघाने केल्या का याबाबत वन खात्यातच साशंकतेचे वातावरण आहे.वन खात्याने नवाब पिता-पुत्रामार्फत अवनीला गोळी घालून ठार केले असले तरी तिचे दोन बछडे आता मोठे झाले आहेत. त्यांना शिकारही करता येत आहे. याशिवाय एक आणखी मोठा वाघ त्यांच्यासोबत आहे. या वाघ व बछड्यांची दहशत तीनही तालुक्यात कायम आहे. त्यामुळे आजही शेकडो हेक्टर जमीन पडिक आहे. लोक जागलीला जायला, शेतात जायला जीवाच्या भीतीने घाबरत आहेत. वन खात्याची यंत्रणा अनेकदा शेती पडिक असल्यामागे वनजमिनीवरील अतिक्रमण हे ठेवणीतील कारण पुढे करते. मात्र प्रत्यक्षात वाघाची दहशत हेच कारण असल्याचे आढळून आले आहे. वन्यजीव खात्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र किती, क्षमता किती, प्रत्येक वाघाला लागणारे क्षेत्र किती, तेथे रेकॉर्डवर पट्टेदार वाघांची नोंद किती आणि प्रत्यक्षात किती वाघांचे अस्तित्व आहे, याबाबी तपासल्यास १३ शेतकरी-शेतमजुरांच्या शिकारी मागील ‘वास्तव’ उघड होण्यास वेळ लागणार नाही.वन खात्याचे वर्षानुवर्षे दुर्लक्षक्षमतेपेक्षा अधिक असलेल्या वाघांना वन्यजीव विभागाने बेशुद्ध करून व पकडून इतरत्र हलविणे अपेक्षित आहे. मात्र वाघांची संख्या प्रचंड वाढली असतानाही वन खात्याने गेली कित्येक वर्ष या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच पांढरकवडा वन विभागातील तीन तालुक्यातील १३ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागल्याचे मानले जाते.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य