शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमध्ये ‘टिप-टिप बरसा पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:08 IST

राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे.

ठळक मुद्दे१५ तालुके कोरडे : पुसदमध्ये मात्र अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे. १५ तालुक्यांचे डोळे आकाशाकडे लागले असताना याला पुसद तालुक्यात मात्र अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासात २३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. पुसद तालुक्यात ९३ मिमी सर्वाधिक पाऊस कोसळला. तर यवतमाळ ११ मिमी , बाभुळगाव १७ मिमी, कळंब ७ मिमी, आर्णी ९ मिमी, दारव्हा १ मिमी, दिग्रस ३० मिमी, नेर १८ मिमी, उमरखेड ७ मिमी, महागाव ७ मिमी, केळापूर २८ मिमी, घाटंजी २९ मिमी, राळेगाव ६ मिमी, वणी ४७ मिमी, मारेगाव ११ मिमी तर झरीमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४५६ मिमी आहे. पावसाने ५० टक्केची सरासरी गाठली आहे. गतवर्षी ७०५ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली होती.पावसात जोर नसल्याने जलप्रकल्पात सरासरी २८ टक्के जलसाठा झाला आहे. यामध्ये बेंबळा २९ टक्के, निम्न वर्धा २८.८९, अधरपूस ६४.६०, अरूणावती २३.२४, अपर पैनगंगा इसापूर ६.५२ तर अडाण प्रकल्पात २८.९५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यामुळे अनेक गावात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात भीषण जलसंकट जिल्ह्यावर येणार आहे.गुरूवारनंतर पावसाला ब्रेकहवामान खात्याने गुरूवार नंतर पावसाला ब्रेक लागणार असल्याचे म्हटले आहे. या काळात मुबलक पाऊस झाला तरच काही प्रमाणातच जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. या पावसावरच शेतकºयांचे रब्बीचे नियोजन अवलंबून रहाणार आहे.