शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत नावडती सोबत नांदण्याची वेळ

By admin | Updated: August 29, 2014 00:08 IST

विधानसभा निवडणूक आचार संहितेतच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. राज्यात आघाडी करून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने

सुरेंद्र राऊत - यवतमाळविधानसभा निवडणूक आचार संहितेतच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. राज्यात आघाडी करून विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने यवतमाळ जिल्हा परिषदेत मात्र आतापर्यंत एकमेंकांची जिरविण्याचाच प्रयत्न केला. संभाव्य निवडणुका लक्षात घेता आता या दोन्ही पक्षांपुढे एकत्र बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. स्थानिक नेते मंडळी आपल्या मतदारसंघात पूरक ठरले अशीच खेळी करण्याच्या मानसिकतेत आहे. जिल्हापरिषदेत सर्वाधिक संख्याबळ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसजवळ आहे. मात्र स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षात विस्तव आडवा जात नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसला शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आली. काँग्रेसनेही जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पुरेपूर कोंडी केली. जिल्हा नियोजन समितीतील निधीच काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी अडवून धरला. त्यामुळे सत्ता येऊनही फारसा उपयोग राष्ट्रवादी व शिवसेनेला झाला नाही. शिवसेनेने अर्ध्यावरच राष्ट्रवादीसोबतचा आपला संसार मोडीत काढला. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून अल्पमतात काम करीत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जिल्हा परिषदेतील गुंता सोडवावा लागणार आहे. २१ सप्टेबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे. आणि त्यापूर्वी १४ सप्टेबर रोजी पंचायत समिती सभापतींची निवड प्रक्रिया आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींचे दुरगामी परिणाम आजपर्यंत विधानसभेत उमटले आहे. ३० हजार मतदारांतून निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य चांगल्या आमदाराचेही गणीत बिघडवू शकतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता नेते मंडळी अडचणीत सापडली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा गुंता सोडविताना स्वत:चा फायदा कसा होईल, हाच प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणार आहे. ‘तुझे नी माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संख्याबळात फार कमी तफावत असल्याने अध्यक्षपदासाठी कोण दावेदारी करतो हेही महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला अध्यक्षपद आल्यास जिल्हा परिषदेचा लाल दिवा बाभूळगाव तालुक्यात जाण्याची दाट शक्यता आहे. सावर, पहुर अथवा फाळेगाव घारफळ या सर्कलमधील सदस्यांना संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद आल्यास डॉ. आरती हरीभाऊ फुफाटे यांचे नाव प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. संभाव्य विधानसभेसाठी जातीय समीकरणातून आपला विजय निश्चित करण्याकडे कल राहणार आहे. पुसद विधानसभेत आंध समाज हा मोठ्या प्रमाणात असून, त्यांची निर्णायक भुमिका राहली आहे.हिच मते मिळविण्यासाठी डॉ. आरती फुपाटे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. उपाध्यक्षपद द्यावयाचे झाल्यास महागाव तालुक्यातील परसराम गंगाराम डवरे यांचाही विचार केला जाऊ शकतो. अजूनतरी नेते मंडळी विधानसभा तिकीटाच्या धामधुमीतच व्यस्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार की नाही, शिवसेना-भाजप युतीचेही भवितव्य काय राहणार हे अजून निश्चित नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यां निवडीची बाब फारसी गांभिर्याने घेतलेली नाही. परंतु पक्षातील इच्छुकांनी आपल्या स्तरावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महिला आरक्षण असल्याने अध्यक्षपदा व्यतिरिक्त इतर पदासाठीच चढाओढ होण्याची चिन्हे आहेत.