शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

वादळाचा तडाखा

By admin | Updated: March 1, 2015 02:05 IST

अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला शनिवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. काही भागात तुरीच्या आकाराची गार कोसळली.

यवतमाळ : अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला शनिवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. काही भागात तुरीच्या आकाराची गार कोसळली. वादळामुळे अनेक घरावरील टीनपत्रे उडाले असून मोठ्ठाली वृक्षही उन्मळून पडले. या वादळी पावसाचा तडाखा गहू, हरभरा, संत्रा, आंबा आदी पिकांना बसला. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऐन गहू काढणीच्या वेळी आलेल्या या संकटाने शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. यवतमाळ शहरासह दारव्हा, दिग्रस, उमरखेड, आर्णी, बाभूळगाव या तालुक्यांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. उमरखेड तालुक्यात बिटरगाव येथे वीज कोसळून पांडुरंग मल्हारी चिकणे हा शेतकरी ठार झाला तर त्याची मनोज आणि विशाल ही दोन मुले गंभीर जखमी झाली. उमरखेड तालुक्यात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. यामुळे शेतात काढलेला गहू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. (लोकमत चमू)कारागृह निवासस्थानाचे छत उडालेयवतमाळ : शहरात सायंकाळी ४ वाजता झालेल्या वादळी पावसाने चांगलाच कहर केला. शहरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वादळामुळे कारागृहाच्या निवासस्थानाचे छतही उडाले. वीज तारा तुटल्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरातील अनेक होर्डिग्ज आणि बॅनरलाही मोठा फटका बसला. शहरात सायंकाळी तीन मिमी पावसाची नोंद करण्यात आली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी मार्केट, नेताजी मार्केटमध्ये वृक्ष ठिकठिकाणी उन्मळून पडले. जय हिंद चौकातील एका दुकानाच्या दर्शनी भागाचे काच कोसळले. कारागृह निवासस्थान कर्मचाऱ्यांसाठी राहण्यायोग्य नाही असे २००० मध्ये सूचित केले होते. मात्र त्यानंतरही त्याची डागडुजी झाली नाही. त्यातच कर्मचारी राहत होती. शनिवारी झालेल्या वादळात या निवासस्थानावरचे छतच उडून गेले. शहर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीतील एका घरावर उंबराचे झाड कोसळले.