शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेतच फेकल्या चपला, जोडे; आजंती गावातील घटना

By विलास गावंडे | Updated: January 30, 2024 21:34 IST

पारधी बांधव संतापले, गावकऱ्यांवर केली दगडफे, तीन जण जखमी

नेर (यवतमाळ) : पारधी बांधवांच्या वास्तव्याची जागा निश्चित करण्यासाठी आजंती येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत गोंधळ झाला. प्रशासनाने सांगितलेल्या जागेला त्यांनी विरोध केला तर, गावकऱ्यांनी समर्थन केले. यामुळे संतापलेल्या पारधी बांधवांनी गावकऱ्यांवर दगडफेक केली. या प्रकारात तीन जण जखमी झाले. रामेश्वर रामसिंग चव्हाण, विनोद चव्हाण आणि रमेश राठोड, अशी जखमींची नावे आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशानुसार आंजती येथे इनकॅमेरा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०:३० वाजता सेभला सुरूवात झाली. सरपंच भाग्यश्री अवघड यांनी गट क्रमांक १९ ही जागा पारधी बांधवाकरिता उपलब्ध करून देण्याविषयीचा ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने असलेल्यांनी हात वर करण्याची सूचना त्यांनी केली. त्यावेळी पारधी बांधवांनी याला विरोध केला.आजंती येथील गावकऱ्यांनी या ठरावाचे समर्थन केले. पारधी बांधवांना सध्या वास्तव्याला असलेली जागाच पाहिजे असल्याने संतापले. सभा सोडून त्यांनी सभागृहाबाहेर ठेवून असलेल्या चपला, जोड्यांचा मारा ग्रामसभेला उपस्थितांवर केला. नंतर रस्त्यावर चक्काजाम करून गावकऱ्यांवर दगडफेक केली. यामध्ये रामेश्वर रामसिंग चव्हाण, विनोद चव्हाण आणि रमेश राठोड हे गंभीर जखमी झाले. काहींना किरकोळ दुखापत झाली.

इनकॅमेरा ग्रामसभेला तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी आशिष राऊत, जी व्ही. धर्माळे, ग्रामसेविका शितल फुणसे, नायब तहसीलदार संजय भोयर आदी उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुल्ला रजनीकांत, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक आदींनी प्रयत्न केले. दरम्यान, यवतमाळ येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.