शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे तीनतेरा

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते.

नांदेपेरा : पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वृक्ष लागवड मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. वृक्ष लागवडीवर शासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करीत असते़ मोठ्या थाटामाटात गावोगावी वृक्ष लागवड केली जाते. मात्र नंतर लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल कुणीही करीत नाही़ परिणामी पावसाळा संपताच झाडे पूर्णत: नष्ट होतात़ तरीही पुन्हा दरवर्षी झाडे लावण्याची मोहीम राबविली जाते़ परंतु एकही झाड जिवंत राहत नसल्याने वृक्ष लागवड मोहिमेचा सर्वत्र फज्जा उडाला आहे़ या वृक्ष लावगडीसाठी अनेक गावी नर्सरी स्थापन केली जाते. त्यात रोपटी लावली जातात. त्यातूनच ग्रामपंचायती, संस्थांना रोपटी पुरविली जातात. मात्र अनेक नर्सरीमध्ये ही रोपटी जागीच वाळून जातात. काही नर्सरींमध्ये तर रोपट्यांचीच झाडे होतात. तरीही कुणीच ती रोपटी वृक्ष लावगडीसाठी नेत नाहीत. तालुक्यात अनेक ठिकाणी असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. संबंधित नर्सरीमध्येच रोपट्यांचे झाडांत रुपांतर झाले आहे. तथापि नर्सरी चालकांवर अद्याप कुठेही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. दरवर्षी गावोगावी झाडे लावली जातात. मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला झाडे देताना त्या झाडांची जोपासणे करणे, ती जिवंत ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झाडे जीवंत ठेवण्याची जबाबदारी सोपविल्यासच, झाडे जिवंत राहू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा निधीही पाण्यात जाणार नाही. गावही हिरवेगार होईल. पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल. त्याचा सर्वांनाच लाभ होईल. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)