लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : एक महिन्यापासून उमरखेड येथील इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरणाऱ्या तीन बुरखाधारी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड रेल्वे स्थानकावर अटक केली.आशिया परवीन शेख इम्रान (२४) रा.तेहरानगर नांदेड, नुरी बेगम शेख नयूम (४०) रा.श्रावस्तीनगर नांदेड आणि अहेमदी बेगम सैयद अफजल (४०) रा.महेबूबनगर नांदेड अशी अटकेतील महिलांची नावे आहे. त्यांना उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुन्हे शाखेच्या महिला पोलीस शिपाई सुलोचना राठोड यांनी नांदेड रेल्वेस्थानकावर प्रत्येक बुरखाधारी महिला प्रवाशांची तपासणी केली. अखेर तीन बुरखाधारी महिलांना जेरबंद करण्यात यश आले.दुसºया गुन्ह्यात गुरुवारी दुपारी उमरखेड शहरात तीन युवक दुचाकीवर संशयास्पद फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके यांना मिळाली. त्यांच्या पथकाने दुचाकीस्वारांची झाडाझडती घेतली. यात सदर दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी एम.एच.२९/के.९६९३ क्रमांकाची दुचाकी उमरखेड येथील बोरबन परिसरातील एका घरासमोरून चोरल्याची कबुली दिली. ही दुचाकी संजय बबन भालगे रा.सिद्धेश्वर वॉर्ड यांच्या मालकीची आहे. या चोरीतील शेख इम्रान शेख मुसा व विधी संघर्षग्रस्त बालक अद्याप फरार आहेत. ही कारवाई एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नीलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, मोहंमद ताज मोहंमद हमीद, सुलोचना राठोड आदींनी केली.
टीव्ही चोरणाऱ्या तीन महिला अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:50 IST
एक महिन्यापासून उमरखेड येथील इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरणाºया तीन बुरखाधारी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड रेल्वे स्थानकावर अटक केली.
टीव्ही चोरणाऱ्या तीन महिला अटकेत
ठळक मुद्देदुचाकी जप्त : उमरखेडमध्ये चोरी, नांदेडमध्ये अटक, एलसीबीची कारवाई