शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

अवैध रेती वाहतुकीने घेतला तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:00 IST

जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.

ठळक मुद्देआर्णी, घाटंजीत चोरटी वाहतूक : भरधाव ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.अडाण नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रक यवतमाळकडे येत असताना अपघात घडला. भरधाव ट्रक कोळी-लिंगी गावाजवळच्या वळणावर अचानक पलटी झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश मेश्राम, किसन ठाकरे हे रेतीच्या ढिगाऱ्यात दबले. तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामध्ये विक्रम सक्रापुरे, प्रभाकर देवीदास ससाने, मंगेश शंकर ससाने, दिलीप अनंत गाडेकर, सचिन श्रावण वाघमारे यांचा समावेश आहे. यातील आकाश दाभेरे व विक्रम सक्रापुरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. यातील आकाश दाभेरे याचा नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतक व जखमी हे यवतमाळनजीकच्या गोधनी येथील असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे रेतीमाफियांकडून रात्रीच वाहतूक केली जात आहे. सदोबासावळी येथून, घाटंजी येथून रेती ट्रक, मॅटेडोअर व इतर काही प्रवासी वाहनातूनही यवतमाळात आणली जात आहे. याला महसूल यंत्रणेतून पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. भीतीमुळे ट्रक भरधाव चालविले जातात. घाटात चालकाचे नियंत्रण नसल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येते.चौपट दराने रेतीची खुलेआम विक्रीशहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. एकाही रेती घाटाचा लिलाव नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात रेती येते कोठून याची चौकशी स्थानिक महसूल यंत्रणेने केली नाही. याचाच फायदा रेतीमाफिया घेत आहेत. आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे रेतीची विक्री सुरू आहे. संपूर्ण कामकाज मध्यरात्रीनंतरच होत आहे. या चोरट्या वाहतुकीला शहरात अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित होतो.