शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिघांची २४ लाखाने फसवणूक

By admin | Updated: August 3, 2016 01:39 IST

भूखंड विक्रीत तीन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी केमीस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र येरणे याला

गुन्हा दाखल : केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक वणी : भूखंड विक्रीत तीन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी केमीस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र येरणे याला पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली. शहरातील विराणी टॉकीज परिसरातील हफिज रहेमान खलील रहमान (४८) यांना रवींद्र दामोधर येरणे (४२) याने गेल्या जानेवारी २०१५ मध्ये केळापूर तालुक्यातील कोठोडा येथील भूखंड विकणार असल्याबाबत सांगितले. या जमिनीचे क्षेत्रफळ एक हेक्टर ३२ आर होते. येरणे यांनी रहमानकडे हा भूखंड पाहिजे असल्यास ‘मी इसारापत्र करून द्यायला तयार आहे’, असे सांगितले. यावर रहेमान यांनी होकार दर्शविला. या भूखंडाची किंमत २६ लाख रूपये सांगितल्याने रहेमान यांनी हा भूखंड तिघांमध्ये घेण्याचे ठरविले. त्यानंतर रहेमान यांनी मिनाज ग्यासीद्दीन शेख, इकबाल खान समशेर खान व मोहम्मद युसुफ अब्दुल रफिक सर्व रा.वणी या तिघांनाही भूखंड विक्रीची माहिती दिली. त्यावर या तिघांनीही होकार देत भूखंड घेण्याचे ठरविले. त्यानुसार गेल्या २८ जुलै २०१५ रोजी या तिघांनीही रवी येरणे यांना २४ लाख रूपये देऊन १०० रूपयांच्या मुद्रांकावर इसारपत्र करून घेतले. ठरल्याप्रमाणे उर्वरित दोन लाख रूपयांचा धनादेश विक्रीच्या दिवशी देण्याबाबत निर्णय घेतला होता. २६ मे रोजी या भूखंडाची विक्री करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार हे तिघेही केळापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचले. मात्र रवी येरणे हे कार्यालयात सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित झाले नाही. त्यानंतर येरणे याच्याशी संपर्क साधला असता, ‘मी विक्रीकरिता आवश्यक असलेले कागदपत्र आणले नाही, त्यामुळे येऊ शकत नाही’ असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर या तिघांनाही संशय आल्याने या भूखंडाबाबत चौकशी केली असता, सदर भूखंडावर यवतमाळ महिला सहकारी बँकेचा एक कोटी ५० लाखांचा बोजा असल्याचे आढळून आले. तसेच ही जमीन अकृषक करताना ती खारीज केल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत तिघांनीही अनेकदा येरणे याच्याकडे विक्रीबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा या तिघांचीही २४ लाखाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हाफिज रहेमान यांनी सोमवारी वणीच्या पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून रवींद्र येरणेविरूद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी येरणे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)