शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

By admin | Updated: June 10, 2017 01:02 IST

गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला.

मांगली, हिरापुरातील घटना : लागोपाठ हल्ले, गावकरी दहशतीत लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात दोेनही मजूर गंभीर जखमी झालेत. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील मांगली येथे घडली. या घटनेने गावकरी दहशतीत असतानाच पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास याच वाघाने हिरापूर शेतशिवारात हिरापूर येथील माजी सरपंच देवीदास निमसटकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. सकाळी घडलेल्या घटनेतील एका जखमीवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले, तर एका जखमीला मुकुटबन येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या मांगली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथील काही मजूर मांगली येथे आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या मजुरांपैैकी अनिल टेकाम(३०) रा.पहापळ व विकास वाघाडे (२८) रा.मांगली हे दोघे प्रात:र्विधीसाठी मांगली गावालगतच्या नाल्यावर गेले. याचवेळी नाल्याच्या काठावरील झुडपात एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. अनिल आणि विकासच्या हालचालीमुळे वाघ बिथरला आणि त्याने थेट दोघांवरही हल्ला केला. त्यामुळे हे दोघांनीही जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. आजुबाजूला असलेल्या लोकांनीही आरडाओरड केल्याने वाघाने नाल्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच, मांगली गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनेनंतर वन कर्मचारी व पोलिसांनी वाघाचा शोध घेतला असता, दोन किलोमिटर अंतरावर एका पाणवठ्याजवळील झुडपात तो बसून असल्याचे दिसून आले. याच वाघाने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हिरापूर शेतशिवारात पेरणीसाठी गेलेल्या देवीदास निमसटकर यांच्यावरही हल्ला केला. झरी तालुक्यात खरीप हंगामावर वाघाची दहशत सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी व शेतमजुरांनी शेतात जाताना एकाकी न जाता समुहाने जावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.