शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

तीन जण राखणीसाठी शेतात गेले.. पण त्यातला एक गायब झाला आणि मग पुढे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:06 IST

महागाव तालुक्यातील भांब-पिंपळगाव जंगलातील शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.

ठळक मुद्देघातपाताची शक्यताडोक्याला गंभीर दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील भांब-पिंपळगाव जंगलातील शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. शंकर दत्ता जाधव (२४) रा.भांब असे मृताचे नाव आहे.शंकर १३ जुलै रोजी रात्री मोठ्या भावासोबत जागलीसाठी शेतात गेला होता. त्याच्यासोबत एक मित्र असल्याचे सांगण्यात येते. हे तिघेही शेतात झोपी गेले. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास शंकरचा मोठा भाऊ लघुशंकेसाठी उठला असता तो जागेवर आढळला नाही. त्याने मित्राला सोबत घेऊन शंकरचा शोध घेतला. मात्र तो जवळपास कुठेही आढळला नाही. ही बाब त्यांनी कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून शंकरचा शोध सुरू झाला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास भांब-पिंपळगाव जंगल शिवारात शेळ्या चारणाऱ्या एका युवकाला शंकर मृतावस्थेत आढळला. त्याने गावकऱ्यांना माहिती दिली. नंतर पोलीस पाटील व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर मृतदेह शंकरचाच असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आत्माराम दत्ता जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी महागाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. मात्र मृतक शंकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आढळली. तसेच त्याच्या हाताला ईलेक्ट्रीक शॉक दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. ठाणेदार दामोदर राठोड यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. उत्तरीय तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून