शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:22 IST

पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरखेड ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकंपाऊंडरची आत्महत्या : नातेवाईक धडकले उमरखेड ठाण्यावर

ऑनलाईन लोकमतउमरखेड : पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरखेड ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या तिघांच्या अटकेसाठी मृतांच्या नातेवाईकांनी उमरखेड ठाण्यात मंगळवारी ठिय्या दिला.डॉ.जयशंकर जवने, वर्षा जयशंकर जवने आणि डॉ. महेश चिन्नावार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक डॉ. जवने यांच्या पॅथॉलॉजीमध्ये रुपेश रोहिदास राठोड (२४) हा तरुण कंपाऊंडर म्हणून कामाला होता. सोमवारी दुपारी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून या तिघांनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे पुढे आले. रुपेश हा या पॅथॉलॉजीमध्ये तीन वर्षांपासून काम करीत होता. दोन महिन्यांपासून त्याचा पगार दिला नाही. वारंवार पैशाची मागणी केली तेव्हा लॅबमधील एक लाख रुपयांचा घोटाळा केला आहे, पैसे फिटेपर्यंत पगार मिळणार नाही, असे सांगितले. या घोटाळ्याच्या आरोपाने अपमानित झालेल्या रुपेशने आत्महत्या केल्याचे पुढे आले. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान या तिघांनाही तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी उमरखेड ठाण्यात ठिय्या दिला. त्यामुळे वातावरण तापले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी समजूत घालून नातेवाईकांना शांत केले.