शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन खासदार आणि बारा आमदार

By admin | Updated: February 12, 2017 00:11 IST

जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे.

प्रतिष्ठा पणाला : मतदार ठरणार निर्णायक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या सर्वांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे. त्यामुळेच जिल्ह्याला हंसराज अहीर, भावना गवळी व अ‍ॅड. राजीव सातव, असे तीन खासदार मिळाले. त्यांच्यापैकी अहीर केंद्रात गृहराज्यमंत्री आहे. आमदारांपैकी मदन येरावार पालकमंत्री, डॉ. रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्री, तर संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहे. या सर्वांना लाल दिवे आहे. उर्वरित खासदार, आमदारही दिग्गज आहेत. या सर्वांना येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाला आपली उपयोगिता सिद्ध करून दाखवून द्यावी लागणार आहे. खासदार, आमदारांच्या बाबतीत सध्या भाजपा आणि शिवसेना सरस आहे. त्यांचेच सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आमदार आहे. त्यापैकी केवळ ठाकरे यांनाच लाल दिवा आहे. तथापि त्यांना त्याचा पुरेपूर वापर करता येणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक कस लागणार आहे. राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेला ही निवडणूक सोपी आहे. त्यांचे थेट केंद्रापासून ते राज्यापर्यंत मंत्री आहेत. सोबतीला राज्यमंत्री दर्जाचा लालदिवाही आहे. तरीही जिल्हा परिषदेची उमेदवारी बहाल करताना भाजपाला अनेक ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाच आपली उमेदवारी द्यावी लागली आहे. उरले केवळ पाच दिवस हे सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाला जेमतेम पाच दिवस उरले आहे. तूर्तास जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. ती उलथून पाडण्यासाठी भाजपा-शिवसेनेला, तर ती कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला व्यूहरचना आखावी लागेल. ग्रामीण भागात चांगला जनाधार लाभलेल्या काँग्रेसला सत्ता कायम राखण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल, एवढे मात्र निश्चित.