यवतमाळ : माजी नगरसेवक प्रवीण दिवटेच्या खुनप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. अतुल उर्फ मोंटू विनोद केवारकर (२०) रा. सेवानगर, अभिषेक उर्फ ओंटू रमेश बिनझाडे (१९) रा. पाटीपुरा या दोघांना सेवानगरातून अटक केली. तर निलेश आत्राम (३०) रा. तारपुरा हा यवतमाळनजीकच्या पांढरकवडा रोडवरील पारवा येथे दारू विक्रेता मुन्ना ठाकूर याच्याकडे आश्रयाला होते. त्यांना आश्रय दिला म्हणून ठाकूरलाही अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात प्रमुख तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गीते, उपनिरीक्षक संतोष मनवर, संजय दुबे, गजानन धात्रक, बंडू मेश्राम, ऋषि ठाकूर, किरण पडघन, अमोल चौधरी, विनोद राठोड यांनी ही कारवाई केली.
दिवटेच्या खुनात आणखी तिघांना अटक
By admin | Updated: September 11, 2016 00:58 IST