शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये तीन बैठका पाणीटंचाई मात्र कायम

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे.

जैसे थे : पहिल्या बैठकीतील समस्या तिसऱ्या बैठकीतही कायम दिग्रस : तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे. पहिल्या बैठकीतील प्रश्न तिसऱ्या बैठकीपर्यंतही सुटले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या शब्दांना अधिकाऱ्यांच्या लेखी काही किमत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिग्रस तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील विहिरींनी तळ गाठला असून अनेक गावातील हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने तयार केलेला कृती आराखडाही कागदावरच दिसत आहे. दिग्रस तालुक्यातील पाणीटंचाईची नेमकी स्थिती काय आहे, यासाठी महिनाभरापूर्वी महसूल राज्यमंत्री आणि या विभागाचे आमदार संजय राठोड यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर दुसरी पाणीटांईची बैठक झाली. या बैठकीतही तेच ते प्रश्न पुढे आले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या उपस्थितीत तिसरी पाणीटंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. त्यांनी सरपंच, उपसरपंच आदींनी मांडलेल्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पाणीटंचाई उद्भवल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे सांगितले. या तिन्ही बैठका पाणीटंचाईची तिच ती गावे आणि त्याच त्या समस्या होत्या. सरपंच आणि सदस्य आपल्या गावातील समस्या मांडून आता हतबल झाले आहे. ना.संजय राठोड यांनी पाणीटंचाईसाठी कितीही पैसा खेचून आणण्याची ग्वाही दिली होती. परंतु अद्यापपर्यंत गावागावातील पाणीटंचाई कायम आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. अनेक गावातील सरपंच तर कशाला समस्या मांडायची, असे म्हणत आहे. ्रपाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांची यातून सुटका कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. (शहर प्रतिनिधी) ‘त्या’ आदेशाचे काय झाले ? पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु बहुतांश गावातील ग्रामसेवक आजही शहरातूनच कारभार पाहात आहे. ग्रामीण जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणेघेणे दिसत नाही. जेथे मंत्र्याच्याच आदेशाला जुमानत नाही तेथे अधिकाऱ्यांनी सांगून ग्रामसेवक मंडळी काय करत असेल, हा प्रश्न आहे.