शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात पोलिसासह तीन ठार

By admin | Updated: March 12, 2017 00:49 IST

यवतमाळ, दारव्हा व अकोलाबाजार येथे घडलेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जण ठार झाले.

यवतमाळ : यवतमाळ, दारव्हा व अकोलाबाजार येथे घडलेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जण ठार झाले. यवतमाळातील बसस्थानक चौकात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एम.एच.३१-ए.पी.३७३५ क्रमांकाच्या ट्रकने पोलीस दलातील मोसीन अयुब खॉ शादुल्ला खॉ यांच्या दुचाकीस (क्र.एम.एच.२९-ए.क्यू.८९७७) कट मारला. यात मोसीन खॉ गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक संदीप मंदीरकर याला अटक झाली. दुसऱ्या घटनेत पहूर नस्करी ते अकोलाबाजार मार्गावरील वळणावर सुभाष लक्ष्मण कावळे (५२) यांची दुचाकी झाडावर आदळली. यात सुभाष कावळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी, चार मुली व आप्त परिवार आहे. तिसऱ्या घटनेत डोल्हारी शेंद्री फाट्यावर नारायण तुकाराम सोनोने (७५) जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. मृत नारायण सोनोने डोल्हारी शेंद्री येथून दारव्हाकडे येणाऱ्या वाहनाची वाट बघत होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यानंतर दारव्हा येथून गावाकडे जाणारे काही व्यक्ती सदर थांब्यावर उतरले असता ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.