शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

तस्करांच्या हल्ल्यात तीन वन कर्मचारी गंभीर

By admin | Updated: May 4, 2016 03:28 IST

मराठवाड्यातील सागवान तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना पैनगंगा अभयारण्यातील खरबी वर्तुळात

 उमरखेड : मराठवाड्यातील सागवान तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना पैनगंगा अभयारण्यातील खरबी वर्तुळात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यात तीन वन कर्मचारी जखमी झाले असून एका सागवान तस्कराला अटक करण्यात आली. तर पाच जण पसार झाले आहे. पैनगंगा अभयारण्यातील खरबी जंगलात सागवान तस्कर शिरल्याची माहिती खरबी वनपरिक्षेत्र अधिकारी संदेश पाटील यांना मिळाली. त्यावरुन वन विभागाचे पथक आणि एसटीपीएफचे जवान जंगलात रवाना झाले. सायंकाळी ६ वाजता कक्ष क्र. ६०३ मध्ये सहा जण सागवान वृक्षाची कटाई करीत असल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुफान हाणामारी झाली. यात आर.एल. यादव, महेश ठणके, गौतम साळवे हे वन कर्मचारी जखमी झाले. ही परिस्थिती वन कर्मचाऱ्यांनी तस्करांचा पाठलाग केला. त्यावेळी तस्कर शेख अल्लाउद्दीन शेख उस्मान (४६) रा. किनवट हा तावडीत सापडला. तर इतर पाच जण अंधाराचा फायदा घेत किनवट शहराकडे पसार झाले. यानंतर शेख अल्लाउद्दीनने दिलेल्या माहितीवरून त्याच्यासह शेख साहब जैनुद्दीन, शेख समू शेख मिज, शेख फिर्दोस शेख रतन, संतोष गड्डमवार, शेख मोहंमद शेख महबूब या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेख अल्लाउद्दीनची पाच दिवसाची वन कोठडी घेण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी खरबी बीटमध्ये वन कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)