शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणला तीन दिवसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:17 IST

येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.

ठळक मुद्देराजकीय पक्ष एकवटले : खंडित वीज पुरवठ्याने जनजीवन प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.गेल्या काही दिवसांपासून वणी शहरातील वीज समस्या जटील बनली आहे. दिवसांतून १५ ते २० वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. वणीचे तापमान लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित झाला की, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. विजेवर चालणा रे व्यवसाय ठप्प पडत आहेत. विजेचा दाब अचानक कमी जास्त होत असल्याने घरातील टि.व्ही., फ्रि ज, मिक्सर आदी उपकरणे खराब होत आहेत.यासंदर्भात विचारणा करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला फोन केल्यास, एक तर संबंधित अधिकारी फोन उचलत नाही, किंवा उचलला तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वणी विद्युत विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने वीज समस्यांमध्ये भर पडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नांदेपेरा मार्गावरील वीज कार्यालयातील तोडफोडप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजाभाऊ पाथ्रडकर, अखिल सातोकर, विवेक मांडवकर, सिद्धीक रंगरेज, राजू तुराणकर, प्रविण खानझोडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वणी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडेवणी शहरात मटका, जुगार, कोळसा चोरी यासह मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. कोळसा खाणीत शस्त्राचा धाक दाखवून कोळसा, भंगार लंपास केल्या जात आहे. यामुळे वणी शहराचा बिहार व्हायला आता वेळ लागणार नाही, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सर्व अवैध व्यवसायाला तातडीने आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.