शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई निवारणासाठी पालिकेला हवे तीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:50 IST

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देआराखडा सादर : आॅगस्ट महिन्यापासून प्रशासनाकडे पत्रव्यवहार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेने उपलब्ध जलस्रोतांच्या सहाय्याने टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला आहे. मात्र अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेकडे बजेट नसल्याने जिल्हा प्रशासनाकडे तीन कोटींची मागणी केली आहे. यासाठी नगराध्यक्षांनी आॅगस्ट महिन्यापासूनच पत्रव्यवहार केला आहे.यवतमाळकरांची तहान भागविण्यासाठी आता बेंबळा प्रकल्पाचाच पर्याय सर्वांना दिसत आहे. त्यासाठी बेंबळातून तातडीने पाणी आणून वितरित करण्याची धडपड सुरू आहे. प्रत्यक्षात या कामात अनेक अडचणी असून निर्धारित कालावधीत हे पाणी येईल की, नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत शहरातील टंचाई निवारणासाठी पालिकास्तरावर उपाय योजना करण्याचा प्रस्ताव ठेवला. याला सर्वच नगरसेवकांनी मान्यता दिली.यवतमाळचे भौगोलिक क्षेत्र दहा पटीने वाढले असून, येथे पाणी पोहोचविण्यासाठी बजेटही तितकेच लागणार आहे. नगरपरिषदेने या संभाव्य टंचाईसाठी तब्बल तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. ही रक्कम जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदानातून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पाच कोटींची रक्कम ही तात्पुरती पाणीपुरवठा योजना यासाठीच देण्यात आली आहे. यातून नगरपरिषद टंचाई आराखड्यावर काम करता येणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाई, मुबलक पाणीसाठ्यांच्या खाजगी विहिरींचे अधीग्रहण, अशा विहिरींवर सबमर्सीबल पंप बसविणे, पाणी पोहोचविण्यासाठी टॅँकरची व्यवस्था, हातपंपाची दुरूस्ती, आझाद मैदान स्विमिंग पूलच्या विंधन विहिरीचे अधिग्रहण प्रस्ताव, टंचाई काळात शहरातील स्विमिंग पूल बंद ठेवणे या उपाय योजना आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.टंचाई काळात बेंबळाचा एकच पर्याय डोळ््यासमोर ठेवून चालणार नाही. शहर व परिसरातील नैर्सगिक जलस्रोतांचाही पर्यायी वापर करणे आवश्यक आहे. पावसाची स्थिती पाहता आॅगस्ट महिन्यापासूनच टंचाई उपाय योजनांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टंचाईसाठी अनुदानाची मागणी केली होती.- कांचन चौधरी,नगराध्यक्ष, यवतमाळ