शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिंतामणी’च्या तीन बस प्रवाशांनी अडविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:48 IST

येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देमेहकरजवळ बस बिघडली : रात्रभर थंडीने कुडकुडलेले प्रवासी पहाटे संतापले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच २९ टी ४०००) १३ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता प्रवासी घेऊन मुंबईकडे रवाना झाली. मात्र रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही बस मेहकरजवळ बिघडली. जवळपास तीन तास बस तेथेच उभी होती. चालक रामराव राठोड यांनी कशीबशी बस दुरुस्त सिंदखेडराजा टीपॉर्इंटपर्यंत आणली. मात्र पुन्हा बस बिघडली. त्यामुळे प्रवासी चिडले. चालकाने मालकाला फोन करून याची माहिती दिली. तासाभरात दुसरी गाडी पाठवितो, असे मालकाने सांगितल्याने प्रवासी शांत झाले. मात्र रात्र उलटून गेली तरी दुसरी बस न आल्यामुळे प्रवासी प्रचंड संतापले. गाडीतील महिला, मुले यांना संपूर्ण रात्र भर थंडीतच घालवावी लागली. चिडलेल्या प्रवाशांनी सकाळी औरंगाबाद, पुणेकडून येणाºया चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस सिंदखेडराजा येथे अडविल्या. त्यावेळी चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. अडविलेल्या गाड्यांपैकी एका गाडीत आम्हाला बसवा, असा हट्ट प्रवाशांनी धरला. मात्र अडविलेल्या गाडीतील प्रवासी उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे राडा वाढला. माहिती मिळताच स्थानिक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगनवाड, पोलीस कर्मचारी कुडे घटनास्थळी आले. त्यांच्या मध्यस्थीने यवतमाळकडे जाणाºया प्रवाशांना खाजगी गाड्यांनी पाठवून देण्यात आले. तसेच सकाळी ८ वाजता चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने संतप्त प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.प्रवासी सुरक्षितयवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनी सांगितले की, बस बिघडल्याने वाद झाला होता. रात्रीची वेळ असल्याने दुसºया वाहनाची व्यवस्था तातडीने होणे शक्य नव्हते. नंतर तीन सुमो गाड्यांची व्यवस्था करून प्रवाशांना पुढे पाठविण्यात आले. तसेच यवतमाळकडे येणाºया प्रवाशांनाही सुरक्षितपणे यवतमाळात पोहोचविले.

टॅग्स :Travelप्रवास