शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टीबी हॉस्पिटलच्या तीन एकर जागेचे अखेर हस्तांतरण होणार

By admin | Updated: August 5, 2016 02:29 IST

शहराच्या मध्यवस्तीतील टीबी हॉस्पिटलची तीन एकर जागा महसूल विभागाला हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश ...

शासनाचा आदेश जारी : व्यापारी संकूल उभारण्याचा मार्ग मोकळा यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीतील टीबी हॉस्पिटलची तीन एकर जागा महसूल विभागाला हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश बुधवार, ३ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेवरील प्रस्तावित व्यापार संकूल, निवासी-शॉपिंग कॉम्पलेक्स, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यवतमाळातील टीबी हॉस्पिटलची ही जागा आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताब्यात होती. बांधकाम खात्याकडील नोंदीनुसार १९९० पासून या जागेवर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि मेन हॉस्पिटल दर्शविण्यात आले आहे. सध्या या जागेवर क्षय रुग्णालय व हिवताप कार्यालय, प्रयोगशाळा, शासकीय निवासस्थाने आहे. १६ हजार ५७५.४० चौरस मीटर अर्थात ३.७ एकर या जागेवर २० हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले आहे. १९९८ ला नगर रचना विभागाने विकास आराखडा तयार केला. त्यानुसार तेथे यवतमाळ नगरपरिषदेने व्यापार संकूल, निवास संकूल आणि वसतिगृह बांधण्याचा मानस व्यक्त केला होता. याच प्रस्तावित कामासाठी ही जागा दर्शविण्यात आली होती. परंतु गेल्या १८ वर्षांपासून या जागेचे हस्तांतरण विविध कारणांनी रखडले होते. अखेर ३ आॅगस्ट रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने ही तीन एकर जागा महसूल व वनविभागाला हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केला. या विभागाकडून ही जागा यवतमाळ नगरपरिषदेला हस्तांतरित केली जाणार आहे. जागा हस्तांतरणामुळे या तीन एकर क्षेत्रात लवकरच शॉपिंग कॉम्पलेक्स उभारण्याची कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही याच परिसरात होणार असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)