शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आर्णी बँक घोटाळ्यातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर खातेदारांनी बँकेत आपल्या रकमेच्या तपासणीसाठी धाव घेतली असता, त्यांची रक्कम खात्यातून गहाळ असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देचौथ्याचा शोध सुरू : जिल्हा मध्यवर्ती बँक, भक्कम पुराव्यांमुळे जामीन नाकारला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी  : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात आहेत.न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर खातेदारांनी बँकेत आपल्या रकमेच्या तपासणीसाठी धाव घेतली असता, त्यांची रक्कम खात्यातून गहाळ असल्याचे आढळून आले. आतापर्यंत पोलीस दप्तरी दीड काेटी रुपये गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली. हा आकडा सतत वाढत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा घोटाळा आणखी मोठा आहे. शिष्यवृत्ती, निराधारांचे अनुदान, कर्ज वसुलीतील रक्कम याचा शोध घेण्यासाठी त्रयस्त सीएमार्फत आर्णी शाखेचे गेल्या दहा वर्षांचे लेखापरीक्षण केले जात आहे. त्यासाठी बँक पाच लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी हे करीत आहेत. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. आर्णीच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. त्यांचे जामिनाचे अर्ज प्रथम श्रेणी न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यांचा आता दारव्हा सत्र न्यायालयातून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न आहे. मंगळवारी महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके) यांच्या वतीने दारव्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, अफरातफर, विश्वासघात, अनियमितता, घोटाळ्याचा हा गुन्हा कागदोपत्री असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले आहेत. सर्वकाही कागदावर सिद्ध होत असल्याने या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही, यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी प्रयत्नरत आहेत. या घोटाळ्यातील आरोपी रोखपाल गवई याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

कुणाचे विवाह अडले तर कुणाचा उपचार रखडला आर्णी शाखेतील परस्पर रक्कम काढून घेतलेल्या बहुतांश ग्राहकांना अद्याप जिल्हा बँकेकडून रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे या ग्राहकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. कुणाच्या कुटुंबातील विवाह, कार्यप्रसंग, तर कुणाचे वैद्यकीय उपचार रखडले आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी रक्कम उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी