शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

इनाम जमीन हस्तांतरण कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: November 30, 2015 02:24 IST

इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले ...

पाच वर्षे लोटली : माहूर येथील दत्तात्रेय शिखर संस्थानला प्रतीक्षायवतमाळ : इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले असतानाही प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्याच्या माहूर येथील श्री दत्तात्रेय संस्थान शिखरला जमीन नावे करून देण्याची प्रतीक्षा आहे. इनाम जमिनीचे हस्तांतरण शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय होत नाही. तसेच देवस्थान इनाम जमिनीला कुळ कायदा लागू नाही. त्यामुळे देवस्थान इनाम जमिनीला कुळ लावून जमीन कुळाला देता येत नाही, अशा प्रकारे देवस्थान इनाम जमिनीचे बेकायदेशीररीत्या हस्तांतरण झाले असल्यास ते रद्द करून देवस्थानच्या नावे पूर्ववत करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाने महसूल प्रशासनाला दिले होते. तसे परिपत्रक ३० जून २०१० रोजी जारी करण्यात आले. या पत्रकानुसार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, वणी, दारव्हा तहसील अंतर्गत देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र माहूर येथील श्री दत्तात्रय संस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याबाबत आणि प्रत्येक तहसील कार्यालयांतर्गत शासनास सादर केलेला अहवाल पूर्णत: चुकीचा असल्याची बाब आर्णी येथील गोपाल भारती यांनी अमरावती विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर आयुक्तांनी चौकशी समिती गठित करून कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, केळापूर, वणी उपविभाग स्तरावर चौकशी समिती गठित करण्यात आली. उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. यात श्री दत्तात्रेय संस्थान शिखर या देवस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पाच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही महसूल प्रशासनाने इनाम जमीन शिखर संस्थानच्या नावाने केलेली नाही. दरम्यान, गोपाल भारती यांनी मंत्रालय सचिव आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सदर प्रकरण विहित कालावधीत निकाली निघाले नसल्याने विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)