एसपींनी दिली भेट : अंजनगावातील व्यापाऱ्याला मारहाणीचे प्रकरणअंजनगाव सुर्जी : येथील व्यापाऱ्याच्या घरात शिरून जबर मारहाण करून पळून गेलेल्या ‘त्या’ हल्लेखोरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागला नाही. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी गुरूवारी व्यापारी दीपक लढ्ढा यांच्या ‘लढ्ढा अँड सन्स’ला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिनस्थ कर्मचाऱ्यांना आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले. घटनेच्या वेळी दीपक लढ्ढा यांच्या घरात उपस्थित असलेल्या तरूणीची चौकशी सुरूच आहे. परंतु त्यातूनही ठोस असे काहीही हाती लागू शकलेले नाही. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून दरोडयाचा कयास व्यक्त केला असला तरी दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याबाबत माहिती मिळू शकली नाही. जखमी दीपक लढ्ढा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.
‘त्या’ हल्लेखोरांचा सुगावा नाही
By admin | Updated: July 10, 2015 00:47 IST