शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

थिमेटने १० जनावरे ठार

By admin | Updated: January 14, 2015 23:16 IST

शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली.

बोरीअरब : शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली. तर पाच जनावरांची प्रकृती गंभीर आहे. ही खळबळजनक घटना लगतच्या पेंढारा शिवारात घडली. नेर तालुक्यातील पेंढारा येथील गुराखी ज्ञानेश्वर रणमले यांनी गावातील २५ ते ३० जनावरे चारण्यासाठी जंगलात नेली. जंगलानजीक शेत असल्याने तेथे वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी गवतावर थिमेट नामक विषारी द्रव टाकून ठेवले होते. गुराखी रणमले यांनी चारण्यासाठी नेलेल्या जनावरांनी थिमेट टाकून असलेले गवत खालले. अल्पावधीतच जनावरांना विषबाधा झाली. त्यामध्ये नऊ गाई आणि एक गोऱ्हा जागीच ठार झाले. तर पाच जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहे. एका गर्भवती गायीची अवस्था पाहून तर कुणाचेही हृदय गहिवरावे. थिमेट खाल्याने तिचे पोटच फाटले. त्यातून चिमुकले पिलूही बाहेर पडले. मातेशेजारी त्या मृत पिलाला पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ही जनावरे पेंढारा येथील शंकर खद्रे, पुलाबाई देवकर, महादेव रणमले, गोविंद लडके, विठ्ठल बेले, परसराम बेले, किसन ढोक आदींच्या मालकीची होती. त्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. घटनेनंतर पशुपालक पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र परस्पर प्रकरण मिटवा, असा सल्ला देत पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पशुपालकांची आहे. मात्र पोलीसच पाठीराखे झाल्याने तो शेतकरी निश्चिंत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)