शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून प्रतिभावंत साहित्यिक घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:49 IST

बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.

ठळक मुद्देराजुदास जाधव : येळाबारा येथे बाल साहित्य संमेलन, कविता आणि चित्रांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे टाटा ट्रस्ट, वर्ल्ड व्हिजन इंडिया, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि २१ गावातील शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भविष्यात शासन पातळीवरसुद्धा अशा आगळ्यावेगळ्या संमेलनाची दखल शासनाने घेतली पाहिजे, कारण याच बालकांमधून पुढे समाज परिवर्तन करणारे साहित्यिक निर्माण होणार आहे, असेही राजुदास जाधव योवळी म्हणाले.मुलांनी स्वत: लिहिलेल्या कविता आणि काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन संमेलनस्थळी लावले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, पंचायत समिती सदस्य सूमन गावंडे, राजू गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्ल्ड व्हिजन प्रकल्पचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरूडकर, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक सुनील भेले यांनी केले. संचालन व आभार संतोष पिंगळे यांनी मानले. व्यवस्थापन आकाश चंदनखेडे यांनी सांभाळले. प्रा. घनश्याम दरणे, सुनील कदम यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.६४ बालकवींच्या कवितासंमेलनात ६४ बालकवींनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. पाठ्यपुस्तकातील पाठावर पपेटसारख्या विविध माध्यमाने नाट्यकर, माध्यमांतर सादर करण्यात आले होते. काव्यसंमेलनाचे संचालन संबोधी भेले हिने केले. चित्रकाव्य प्रदर्शन पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.शाळा बंद धोरणाचा निषेधसंमेलनात विविध ठराव घेण्यात आले. हातगाव येथील यश बल्की यांनी ३० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाचा निषेध करण्यात येत आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे, असा ठराव मांडला. बाल साहित्य संमेलनाचे शासनस्तरावर आयोजन व्हावे, असाही ठराव घेतला गेला.