शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

By admin | Updated: November 15, 2014 02:11 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे.

नेर : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी जादा दाम मोजावे लागण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. कधी अती पाऊस तर कधी परतीचा पाऊस आणि गारपीट आणि कधी अत्यल्प पाऊस अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसत असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. यावर्षी खंडित पावसामुळे दीड ते दोन महिने उशिरा झालेली पेरणी. त्यानंतर दुबार व तिबार पेरणीचे संकट आणि पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनची उगवण अत्यल्प झाली. बाधित बियाण्याच्या पेरणीमुळे यावर्षी सोयाबीनवर पिवळा (मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या, एकरी एक पोत्याची झडती सध्या होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापेक्षाही यावर्षीचे सोयाबीन खराब झाल्यामुळे ते पुढच्या वर्षीच्या पेरणीयोग्य नाही. परिणामी २०१५ मध्ये खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सोयाबीन कापणीचा व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकूण लागवणीपैकी सोयाबीनचे ७० टक्के क्षेत्र करपले आहे. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने त्या मोठ्या प्रमाणात पोचट राहिल्या. व दाणेही बारिक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रुपये खर्च सोयाबीनला येत असताना उत्पन्न मात्र केवळ अडीच ते तीन हजार रुपये मिळत असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न अवस्थेत आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली होती. यावर्षी मात्र त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी येणार असल्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची हीच परिस्थिती आहे. दरवर्षी अत्यल्प उत्पादन व निकृष्ट दर्जाचे बियाणे यामुळे पुढील हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळणे दुरापस्त झाले आहे. महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्यांचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बोगसच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश ड्रॉप यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे पीक नगदी असले तरी श्ेतकऱ्यांना आता त्यावर अधिक अवलंबून राहता येणार नाही. तेव्हा अन्य पर्यायाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयाबीनचा पुढील हंगाम देखील फारसा लाभदायक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून न राहता इतरही लागवणीचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)