शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वणीत अकरावी प्रवेशाचा प्रश्न चिघळणार

By admin | Updated: July 28, 2016 01:07 IST

वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात

चर्चा निष्फळ : शुक्रवारपासून पदाधिकाऱ्यांचे बेमुदत तर विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण वणी : वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात शिक्षण विभागाशी झालेली चर्चाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली २९ जुलैपासून स्वप्नील धुर्वे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार संघटनेने केला आहे. वणी उपविभागातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी ५ जुलैै रोजी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली १८३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागेल त्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल व कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र १० दिवसानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. यासंदर्भात विचारणा केली असता, आम्ही वणीतील महाविद्यालयांना यादी पाठविली आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रवेशाचा प्रश्न सुटला नाही. १६ जुलैैला येथील महसूल भवनात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने प्रवेशासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही प्रवेश रखडले. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. त्याचाही उपयोग झाला नाही. २१ जुलैैला पुन्हा यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी दिली. मात्र आता जुलैै महिन्या संपत आला असला तरी अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया न झाल्यास शुक्रवार २९ जुलैैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे यांनी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा अकरावी प्रवेशाच्या प्रकरणात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल केली असून या प्रकरणाची उच्चस्तरिय चौैकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौैजदारी कारवाई करण्याची मागणी स्वप्नील धुर्वे यांनी केली आहे. बुधवार आमरण उपोषणासंदर्भात वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.