शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे नादुरूस्त कार पेटली

By admin | Updated: May 17, 2017 00:58 IST

येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ असलेल्या एका सर्व्हिसिंग सेंटर व खासगी सेतू केंद्राच्या बाजुला अनेक

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा: येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ असलेल्या एका सर्व्हिसिंग सेंटर व खासगी सेतू केंद्राच्या बाजुला अनेक दिवसांपासून ठेऊन असलेल्या जुन्या व बंद स्थितीतील मारुती ८०० कारला अचानक आग लागून ही कार जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. लोहारा लाईनच्या बाजुला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय परिसरात नगरपरिषदेचे गाळे असून या ठिकाणी एक वाहन दुरुस्तीचे दुकान तसेच आपले सरकार सेवा केंद्र हे इमरान अहमदखान यांचे खासगी सेतू केंद्र आहे. या सेतू केंद्रासमोरच एक फर्नीचर साहित्याचे दुकान व इतर अनेक दुकाने आहेत. येथील अशपाक पोसवाल यांनी मागील वर्षी बंद स्थितीत असलेली जुनी मारोती ८०० कार विकत घेतली होती. तेव्हापासूनच बंद अवस्थेत असलेली ही कार आपले सरकार सेवा केंद्र या खाजगी सेतू केंद्राच्या समोरच ठेऊन होती. ही गाडी त्यांनी नुकतीच भंगारमध्ये विकायला काढली होती. मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास या गाडीचे दार कटरने कापन्याचे काम सुरु होते. कारच्या उजव्या बाजुचे समोरचे दार कटरने कापायला सुरुवात केली. हे दार कापून झाल्यावर मागचे दुसरे दार कटरने कापायला सुरुवात करताच, घर्षण होऊन ठिणग्या उडायला लागल्या.या ठिणग्यांमुळे गाडीच्या टायरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात गाडीच्या इंजिननेही पेट घेतला. आसनांनीही पेट घेतला. आजुबाजूला असलेल्या लोकांना हे दृष्य दिसताच, त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मिळेल त्या साधनाने, त्यांनी पाणी आणून या जळत्या गाडीवर टाकले व आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.