शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामपंचायत रेकार्डचे हस्तांतरणच नाही

By admin | Updated: September 25, 2014 23:34 IST

पंचायतराज सशक्तीकरण अभियानातंर्गत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाची घडी बसविण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायतीना आॅनलाईन जोडण्यासाठी महासंग्राम सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प

यवतमाळ : पंचायतराज सशक्तीकरण अभियानातंर्गत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाची घडी बसविण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायतीना आॅनलाईन जोडण्यासाठी महासंग्राम सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. याउलट तेवढ्याच अपहाराच्या तक्रारी सुध्दा येत आहे. अनेक प्रकरणाच्या चौकशीत ग्रामपंचायती जवळ रेकॉर्ड नसल्याचे आढळून येते. यवतमाळ पंचायती समितीत झालेल्या मुद्रांक शुल्क घोटाळ््याच्या चौकशीतून हे वास्तव समोर आले आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ पंचायत समितीतच तब्बल आठ कोटींच्या मुद्रांक शुल्काचा अपहार झाला आहे. मात्र याची चौकशी करून दोषींवर करावाईसाठी कुचराई केली जात आहे. पंचायत विस्तार अधिकाऱ्यांपासून अनेकांनी संगणमताने ही रक्कम हडपल्याचे वरकरणी दिसून येते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून चौकशीचा सोपस्कार जिल्हा परिषदेने पुर्ण केला. त्यामध्ये धक्कादाय वास्तव समोर आले. शहरालगतच्या १५ ग्रामपंचयतींमध्ये कुठलेच रेकॉर्ड नसल्याचे आढळून आले. मजेशीर बाब म्हणजे संबधित ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर त्याने त्यांनी प्रभार हस्तातरितच केला नाही. मुळात बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्याने नव्याने आलेल्या व्यक्तीला प्रभार देणे आवश्यक आहे. शिवाय कॅशबुक मधिल सर्व नोंदी जमा खर्च याची माहिती देणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र आपले पितळ उघडे पडून नये म्हणून तक्रारी झाल्या तरी ग्रामसेवकांकडून प्रभार हस्तांतरीत केला जात नाही. नेमक्या याच प्रकारामुळे आठ कोटीेंच्या मुद्रांक शुक्लाचा तामळमेळ लागत नाही. ही स्थितीत यवतमाळ शहरा लगतच्या वडगाव ग्रामपंचायत, लोहारा, भोसा, मोहा, वाघापूर, पिंपळगाव, उमरसरा, कोळंबी, गोधणी, किन्ही, डोर्ली, मडकोणा, मंगरूळ, भोयर या ग्रामपंचातीमध्ये आढळून आली. यावरून आडवळणावर असलेल्या ग्रामपंचायतींची काय स्थिती असले हे लक्षात येते. प्रशासनाचे आपल्याच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाला खिळ बसत आहे. एकीकडे संपूर्ण कामकाज आॅनलाईन करण्याची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे ग्रामसेवक बदलताच जुने रेकॉर्ड गायब होत आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)