शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही फिरकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:00 IST

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही.

ठळक मुद्देसाहित्य वर्तुळात आश्चर्य : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही.संमेलनात सहभागी व्हावे, अरुणा ढेरे यांची भूमिका जाणून घ्यावी, असे निवेदनाद्वारे आवाहन करणाऱ्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, दिलीप माजगावकर, जयराज साळगावकर, डॉ. स्नेहलता देशमुख, शेषराव मोरे, मंगला गोडबोले, द. मा. मिरासदार, पांडुरंग बलकवडे यांनी मांडले. त्याचवेळी विजय भटकर, दिलीप करंबेळकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. विलास खोले, प्रदीप रावत, रेखा इनामदार, योगेश सोमण, नामदेव कांबळे, अविनाश धर्माधिकारी, सतीश जकातदार, प्र. के. घाणेकर, अरुण करमरकर, अश्विनी मयेकर आदींनी निवेदनाद्वारे संमेलनाला उपस्थिती लावण्याचे आवाहन केले होते.हजारो साहित्यप्रेमींचा हिरमोड होऊ नये, संमेलनाध्यक्षांचे प्रगल्भ विचार आणि घडलेल्या घटनेबाबतची भूमिका समजून घेता यावी, यासाठी बहिष्कार न घालता महामंडळ आणि आयोजकांच्या कृतीचा निषेध करावा, पण त्याचवेळी संमेलनाध्यक्षांचा अवमान होऊ नये म्हणून हे संमेलन यशस्वी करावे असे वाटते’, अशी भावना या साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात यापैकी एकानेही उपस्थिती न लावल्याने साहित्य वतुर्ळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रसिकांना आवाहन करणाऱ्यांनी संमेलनात हजेरी लावून आपली भूमिका मांडायला हवी होती, असे मतही साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.साहित्यिकांची अनुपस्थिती, रसिकांची निराशासाहित्यिकांच्या भेटीसाठी संमेलनस्थळी दाखल झालेल्या श्रोत्यांची साहित्यिकांच्या बहिष्काराने पुरती निराशा झाली. त्यामुळे संमेलन स्थळी दाखल झालेले ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, भारत सासणे या मोजक्या साहित्यिकांसोबत सेल्फी घेण्यासाठी श्रोत्यांची गर्दी होत होती. हे साहित्यिक जेथे जातील तेथे श्रोते त्यांच्याभोवती गराडा घालत होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ