शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी वाढविण्यासाठी विदर्भात प्रयत्न झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांची खंत : पोकळी भरून काढणार

गजानन अक्कलवार ।ऑनलाईन लोकमत कळंब : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली हल्लाबोल पदयात्रा शनिवारी येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बातचित केली.यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. भाजपाला राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा असल्याची शंका वारंवार घेतली जाते. परंतु, या सरकारविरूद्ध राष्टÑवादीनेच वारंवार आवाज उठविला. सरकारच्या धोरणांवर अनेकदा टिका केली. शिवसेना वेळेवर शेपूट घालणारा पक्ष आहे. सरकारमध्ये राहून सरकारविरूद्ध भूमिका घेताना आम्ही कधी पाहीले नाही. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा त्यानी खासदार सुळे यांनी केला.या शासनाने गरिबांची थट्टा चालविली आहे. कर्जमाफीवरून शेतकºयांना जेरीस आणले जात आहे. कीटकनाशकांच्या फवारणीतून झालेल्या विषबाधाप्रकरणी शासन संवेदनाशून्य आहे. मुख्यमंत्री यवतमाळात लपून येतात व कोणाशीही न बोलता निघून जातात. यावरून या शासनाची असंवेदनशिलता अधोरेखित होते. आता झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे आंदोलन यवतमाळातून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाखांचा धनादेश देऊन सरकारने आपली जबाबदारी झटकली. परंतु राष्टÑवादी मात्र आधार देण्याचे काम करणार आहे. काल एका कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची भूमिका पक्षाने घेतली. सरकारनेही इतर कुटुंबांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यवतमाळमधये कृषि विभागात ५०% जागा रिक्त आहे. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकºयांना सुरक्षा कोट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही. त्यामुळे या सरकराच्या थापांना यापुढे बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचारशिवसेना अथवा त्यांच्या मंत्र्यांनी केलेली पाच चांगली कामे सांगावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले. महाराष्टÑाच्या उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ?, असा सवाल करीत त्यांनी शिवसेनेच्या दुट्टप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.केंद्र व राज्य सरकार आश्वासन विसरलेमागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे