शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खचरूनही आदिवासींचा विकास नाही

By admin | Updated: June 5, 2014 00:04 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयामार्फत आत्तापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या. या योजनांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला.

यवतमाळ : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयामार्फत आत्तापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या. या योजनांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु आदिवासी बांधवाचा पाहिजे तसा विकास झालाच नाही.आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, समाज सुशिक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने १९७२ मध्ये पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची स्थापना केली. त्यानंतर पुसद येथेही आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देण्यात आले आहे. परंतु आदिवासीबहुल असलेल्या या भागातील आर्थिक परिस्थिती, आरोग्य विषयक उपलब्धता, सामाजिक व शैक्षणिक जागृती बघता शासनाच्या या सर्वसमावेशक योजनांमुळे आदिवासी बांधवांचा कोणता विकास झाला? मागील ४0 वर्षांत या योजनांचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित होतो. आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. तरी या योजना आदिवासींपर्यंत पूर्णत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष लाभाचा विषय वेगळा असला तरी योजना राबविणार्‍या या यंत्रणेतील कमतरता, त्रुट्या अद्याप दूर करण्यात आल्या नाहीत. दरवर्षी या प्रकल्प कार्यालयाला कोट्यवधींचा निधी मिळतो. संपूर्ण जिल्हय़ाच्या अंदाजपत्रकाखालोखाल प्रकल्प कार्यालयाचे अंदाजपत्रक असते. दरवर्षी अनुसूचित जमाती अनुदानातून कोट्यवधी रुपये बांधकामावर खर्च केले जातात. यात विविध आश्रमशाळा व वसतिगृहांच्या बांधकामांचा समावेश आहे. आदिवासी भागातील विकास कामे ही ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत केली जातात. परंतु ही कामे करण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प विभागाजवळ स्वतची यंत्रणा नाही. त्यामुळे दुसर्‍या कोणत्याही यंत्रणेला अनुदान देऊन मोकळे व्हावे लागते. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय व खासगी अनुदानित अशा शेकडो आदिवासी आश्रमशाळा आहेत. परंतु काही खासगी अनुदानित आश्रमशाळा सोडल्या तर बहुतेक आश्रमशाळांचा दर्जा हा अतिशय निकृष्ट आहे. प्रकल्प कार्यालयात अनेक वर्षांंपासून मोठय़ा प्रमाणावर कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. या प्रकल्पामार्फत आदिवासींसाठी अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी, त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यांची स्थिती ‘जैसे थे’च आहे.  (कार्यालय प्रतिनिधी)