शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

डेक्कन शूगरच्या दारूवर एक्साईजचे नियंत्रणच नाही

By admin | Updated: July 3, 2015 00:20 IST

दारूची निर्मिती करणारा डेक्कन शूगर कारखाना आणि जिल्ह्यातील ठोक दारू विक्रेत्यांकडे शासनाचा महसूल बुडतो आहे.

यवतमाळ : दारूची निर्मिती करणारा डेक्कन शूगर कारखाना आणि जिल्ह्यातील ठोक दारू विक्रेत्यांकडे शासनाचा महसूल बुडतो आहे. कारण तेथे या महसुलावर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारीच तैनात नाही. खुद्द एक्साईजच्या अधिकाऱ्यांनीच हा धक्कादायक प्रकार सांगितला असून त्यासाठी अधिकाऱ्यांची रिक्त पदे हे कारण पुढे केले गेले आहे. राज्यात शासनाला केवळ दारू निर्मिती व विक्रीतून सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात हा आकडा ५५ कोटींचा आहे. मात्र त्यानंतरही शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमानुसार दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपस्थित असणे बंधनकारक आहे. कारखान्यातून निघणारी प्रत्येक दारूची बॉटल या अधिकाऱ्याच्या नजरेखालून जावी, असे बंधन आहे. पर्यायाने प्रत्येक बॉटलचा महसूल शासनाला जमा व्हावा हा मुख्य उद्देश आहे. हाच नियम ठोक दारू विक्रेत्यांसाठीसुद्धा आहे. या प्रत्येक ठोक दारू विक्रेत्याकडे दुय्यम निरीक्षक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात या बंधनाला फाटा देऊन कारखाने व ठोक विक्रेत्यांकडून दारू बाहेर पडते आहे. एक्साईजचे नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नाही. यवतमाळ-आर्णी रोडवर मांगूळ येथे डेक्कन शूगर प्रा.लि. हा देशी दारूची निर्मिती करणारा कारखाना आहे. औरंगाबादच्या मे.प्रणव अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा परवाना दहा वर्षासाठी भाड्याने घेऊन हा कारखाना सुरू केला गेला आहे. देशी दारूची निर्मिती होत असूनही या कारखान्यात एक्साईजचा कुणी अधिकारी नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे डेक्कन शूगर फॅक्टरी आणि ठोक विक्रेत्यांकडून दारूची दाखविली जाणारी विक्रीच ग्राह्य मानली जाते. या माध्यमातून महसुलाची चोरी होत असण्याची दाट शक्यता एक्साईजमधूनच वर्तविली जात आहे. एक्साईचे नियंत्रण नसल्याने बोगस दारूची विक्री, अव्वाच्या सव्वा दर आकारणे या सारखे प्रकारही सर्रास घडत आहेत. मद्य शौकिनांमधून तशा तक्रारीही मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरेसे अधिकारी नसल्याचे कारण सांगून कारखाना व ठोक विक्रेत्यांना एक्साईजने जणू मनमानी पद्धतीने दारू विक्रीला सूट दिल्याचे दिसून येते. महसूल कर्मचाऱ्यांकडून तपासणीउत्पादन शुल्क विभागाकडे १६ तालुक्यांसाठी केवळ १४ शिपाई आणि निवडकच अधिकारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, देशी दारू दुकानांच्या तपासणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांकडेसुद्धा समांतर सोपविली आहे. तहसीलदारांकडून या तपासणीचा अहवाल बोलविला जाणार आहे. एक्साईज एसपींनी मांडल्या व्यथा खासदार भावना गवळी यांनी नुकताच एक्साईजच्या कामकाजाचा आढावा घेतला असता अधीक्षक पराग नवलकर यांनी आपल्या अडचणी गवळी यांच्यापुढे मांडल्या. डेक्कन शूगर व ठोक विक्रेत्यांकडे पूर्णवेळ एक्साईज अधिकारी तैनात नसल्याबाबत गवळी यांनी आश्चर्य व्यक्त केले. तत्काळ पर्यायी व्यवस्था करून यंत्रणा तैनात करण्याचे व शासनाचा महसूल वसूल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)एक्साईजच्या नावाने प्रती बाटली १० रूपये वसुलीजिल्ह्यात ३०९ वाईन बार आहेत. याशिवाय १३४ देशी दारू विक्रीचे परवाने आहेत. विदेशी दारू व बीअर विक्रीचेही परवाने आहेत. दारूच्या प्रत्येक बॉटलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नावाने दहा रुपये वसूल केले जात असल्याच्या खळबळजनक तक्रारी पुढे आल्या आहेत. या वसुलीची कल्पना एक्साईजला आहे. मात्र त्यानंतरही एक्साईजकडून या वसुलीवर कधी आक्षेप घेतला गेला नाही किंवा कुणावर कारवाई केली गेली नाही. ते पाहता ही रक्कम एक्साईजकडेच जमा होत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एक्साईजची भूमिका संशयास्पद आहे. एकाच परवान्यावर अनेक गावात दारू पुरवठाबीअरबारचा एका विशिष्ट ठिकाणी सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देऊन दारू विक्रीचा परवाना दिला जातो. मात्र या एका परवान्याआड अनेक बारमधून वेगवेगळ्या ठिकाणी देशी-विदेशी दारूचा पुरवठा व विक्री केली जाते. बारमधून चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूचा साठा काढला जातो. बार मालकाचे काही फंटर त्या परिसरातील गावांमध्ये ही दारू पोहोचवितात. नंतर त्या गावातील काही ठराविक व्यक्तींकडून या दारूची विक्री केली जाते. अशा चोरट्या मार्गाने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जातो. कारण चोर मार्गाने निघणाऱ्या या दारूत बोगस व बनावट दारूचा समावेश राहतो. शिवाय वाईनशॉपमध्ये मिळणाऱ्या किंमतीच्या दीडपट ते दुप्पट दर या दारूसाठी आकारला जातो. या माध्यमातून मद्य शौकिनांची लूट केली जाते.