शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुपयांच्या नाण्यांवर बंदी नाहीच

By admin | Updated: March 17, 2017 02:42 IST

दहा रुपयांच्या नाण्यांबाबत सध्या सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही नाणी बनावट असून ती बंद झाल्याची अफवा पसरविली जात आहे.

स्टेट बँकेचे स्पष्टीकरण : बनावट-बंदची केवळ अफवाच, नाणे स्वीकारणे बंधनकारक यवतमाळ : दहा रुपयांच्या नाण्यांबाबत सध्या सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही नाणी बनावट असून ती बंद झाल्याची अफवा पसरविली जात आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने कोणतेही नाणे चलनातून बाद केले नाही. दहा रुपयांची नाणीही चलनात असून ती बँकांच्या सर्व शाखांमध्ये स्वीकारली जात असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक प्रमोदसिंह बैस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गत काही महिन्यांपासून दहा रुपयांची नाणी घेण्यास व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकही नकार देत आहे. नोटबंदीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात दहा रुपयांची नाणी आली. त्यामुळे ही नाणी बनावट असल्याची अफवा पसरली. त्याला काही लोकांनी खतपाणी घातले. परिणामी आज दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यावरून वादाचे प्रसंग उद्भवत आहे. अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे घेतले जात नसल्याचे सांगितले जात आहे. काहीजण तर बँकेतही ही नाणी स्वीकारत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे दहा रुपयांच्या नाण्यांबाबत नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या यवतमाळ येथील मुख्य शाखेशी संपर्क साधला तेव्हा वेगळेच वास्तव पुढे आले. मुख्य प्रबंधक प्रमोदसिंह बैस म्हणाले, कोणतेही नाणे अथवा नोट व्यवहारातून बाद करायची असल्यास रिझर्व्ह बँक सर्व बँकांना सूचना देते, तशी सूचना बँकेच्या दर्शनी भागात लावली जाते. परंतु रिझर्व्ह बँकेने तशी कोणतीही सूचना दिली नाही. नाणी बंद झाली, ही केवळ अफवा असून आमच्या सर्व शाखांमध्ये दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असल्याची त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता दहा रुपयांच्या नाण्यांचा स्वीकार करावा, असेही त्यांनी आवाहन केले. नोटबंदी होताच व्यवहारासाठी दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात आली आणि तेथूनच दहा रुपयाचे नाणे बनावट असल्याची अफवा पसरली होती. (नगर प्रतिनिधी)