शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांवर कारवाईच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:22 IST

तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

आदेशाची पायमल्ली : राळेगाव आरोग्य विभागाकडे माहितीचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचीही पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ८ जानेवारी २०१७ रोजी यवतमाळ येथे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे बजावले होते. आज सहा ते सात महिन्यांनंतरही बहुतांश ठिकाणी बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. केवळ चालढकल सुरू आहे. याबाबत माहिती कायद्यांतर्गत माहिती घेतली असता राळेगाव, कळंब, बाभूळगाव व केळापूर तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पत्र पाठवून त्यांना माहिती देण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले होते. परंतु काही आरोग्य केंद्रातून ही माहिती अद्यापही पुरविण्यात आली नाही. तर काही आरोग्य केंद्रांनी त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना ती पुरविण्याबाबत कळविले. एकंदरीत जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे यावरून स्पष्ट होते. दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळविले, परंतु त्याची तारीख त्यांच्याकडे उपलब्ध नाही. वरध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे दर्शवून विविध कारणे सांगितल्या गेली. यामध्ये एफआयआर दाखल करण्याबाबत संदिग्ध भूमिका घेण्यात आली. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतही तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे कळविण्यात आले. तेथेही अशाच प्रकारे झाकाझाक करण्यात आली. वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा बोगस डॉक्टर आहेत. तेथे एका बोगस डॉक्टरचा दवाखाना सुरू असून, पाच बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. मादणी येथे पाच वर्षापासून बोगस डॉक्टर सक्रीय असल्याचे सांगण्यात आले. पण कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. याचप्रमाणे करळगाव, उमरी, सावरगाव आदी ठिकाणीही संदिग्ध परिस्थिती आढळून आली. ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीविताशी खेळजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून यातून ते केवळ पैशासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या जिविताशी खेळ करीत आहे. उल्लेखनिय म्हणजे प्रचंड गंभीर असलेल्या या प्रकाराबाबत आरोग्य विभाग पाहिजे तसे गंभीर दिसत नाही. आरोग्य विभागाकडे याबाबत आवश्यक ती माहितीसुद्धा उपलब्ध नाही. ठोस कारवाईसुद्धा यामध्ये झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहे.