शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

५० ग्रामपंचायतीत वीजपुरवठाच नाही

By admin | Updated: January 25, 2015 23:29 IST

एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक

पुसद : एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरविलेले संगणकही धूळ खात पडले आहे. तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायतींची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक ग्रामपंचायतींचा कारभार पारावरच होतो. तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींपैकी ८० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारती असून ३९ ग्रामपंचायती गावातील शाळा अथवा इतर शासकीय इमारतीत कामकाज चालवितात. ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्यामुळे जिल्हा परिषदेने पुरविलेले संगणक सरपंच अथवा ग्रामसेवकांच्या घरी पडलेले आहेत. ग्रामपंचायतींच्या कारभारात सुसूत्रता यावी, नागरिकांची कामे जलदगतीने व्हावी या हेतूने सर्व ग्रामपंचायतींना संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. याच सोबत सर्व ग्रामपंचायती आॅनलाईनने जोडण्यात आलेल्या आहेत. परंतु हे सर्व पुसद तालुक्यात तरी कागदोपत्रीच दिसत आहे. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे या ठिकाणचे संगणक कोठे गेले, हा प्रश्न आहे. वीज जोडणीसाठी आतापर्यंत कुणी व कसे प्रयत्न केले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. सरपंच, सचिव व ग्रामसेवक नेमके काय करतात, हासुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वीज जोडणीच नसल्याने संगणक सरपंच, ग्रामसेवकांच्या घरी राहणार, हे यातून स्पष्ट होते. संबंधित लोकप्रतिनिधींचेदखील याकडे लक्ष नाही. त्यामुळे आॅनलाईन योजनेला हरताळ फासला जात असून लाखो रुपये पाण्यात जात आहे. (तालुका प्रतिनिधी)