शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

साळ्याने जावयाला भोसकले

By admin | Updated: August 7, 2015 02:27 IST

शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नायगाव (बु.) येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास साळ्याने जावयाला चाकूने भोसकले.

गंभीर जखमी : नायगाव (बु.) येथील बुधवारी सायंकाळची घटनावणी : शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नायगाव (बु.) येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास साळ्याने जावयाला चाकूने भोसकले. यात जावई गंभीर जखमी झाला असून त्यांना चंद्रपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तलाश महादेव त्रिशुले (३३) रा.नायगाव (बु.) असे आरोपीचे नाव आहे. तलाशने आपल्या आईला काही दिवसांपूर्वी घरातून हाकलून दिले होते. त्याची वृद्ध आई धोपटाळा (चंद्रपूर) येथील मंगला अमर सूर्यवंशी (३२) नामक मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. गेल्या काही दिवसांपासून तलाशची आई मुलगी मंगलाकडेच राहत होती. दरम्यान मंगळवारी मंगला आईला घेऊन नायगाव (बु.) येथे पोहोचली. तेथे मंगलाने आईला एक किरायाची खोली करून दिली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वृद्ध आईसह मंगला आणि दुसऱ्या बहिणीचे यजमान सिद्धार्थ गुलाब खोब्रागडे (४४) रा.चंद्रपूर हे तिघे तलाशच्या घरी पोहोचले. या तिघांनी तलाशला वृद्ध आईच्या साहित्याची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात सिद्धार्थ खोब्रागडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन तलाशने जावई सिद्धार्थ खोब्रागडे यांच्यावर चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. शिरपूरचे ठाणेदार मनोज केदारे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळ गाठले. तेथे प्रथम जखमी सिद्धार्थला चंद्रपूर येथील रूग्णालयात रवाना करण्यात आले. त्यानंतर पहाटे ४ वाजतापर्यंत पोलीस पथकाने फरार झालेल्या तलाशचा शोध घेतला. गुरूवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास तलाशला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत केदारे यांच्यासह योगेश ढाले, राऊत, बागेश्वर, कुळसंगे आदींनी सहभाग घेतला. याप्रकरणी तलाशविरूद्ध भादंवि ३०७, ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. (कार्यालय प्रतिनिधी)