शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

राज्यातील सव्वालाख होतकरू चिमुकल्यांना राखीव जागांवर संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:44 IST

गरिबांच्या मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या जागा यंदा ६१४५ इतक्या वाढल्या आहेत.

ठळक मुद्देआरटीईच्या जागा वाढल्यादोन दिवसात ११ हजार अर्ज, आणखी १७ दिवस बाकी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरिबांच्या मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या जागा यंदा ६१४५ इतक्या वाढल्या आहेत. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात पहिलीत मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यात आरटीई प्रवेशासाठी १ लाख २६ हजार २१ इतक्या भरभक्कम जागा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी १ लाख १९ हजार ८७६ जागा उपलब्ध असूनही ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये पहिल्या वर्गात गोरगरिबांच्या मुलांसाठी २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यंदा ही आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अवघ्या दोनच दिवसात राज्यभरात ११ हजार ११८२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करण्यासाठी आणखी १७ दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने मोफत प्रवेशासाठी यंदा अर्जांचा पाऊसच पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा सुरूवातीला उदासीनता दाखविणाऱ्या शाळांनीही नंतर आघाडी घेत या प्रक्रियेत भराभर सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी ८ हजार ३०३ शाळांनीच आरटीईसाठी नोंदणी केली होती. तर यंदा त्यात वाढ होऊन ६७७ शाळांची भर पडली आहे. आता राज्यातील ८ हजार ९८० शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी तब्बल १ लाख २६ हजार २१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.बनवाबनवीवर बारकोडचा उताराआरटीई प्रवेश प्रक्रियेत वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. आॅनलाईन अर्ज भरताना कुठलाही दाखला जोडावा लागत नाही. त्याचाच फायदा घेत अनेक धनदांडग्यांच्या पाल्यांनाही शाळांनी आरटीईतून प्रवेश दिल्याच्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यामुळेच यंदा अर्ज भरताना उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोडचा क्रमांक नमूद करण्याची अट टाकण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र