शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शिवसेनेत अंतर्गत कलह सुरूच

By admin | Updated: June 26, 2014 23:31 IST

वणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात.

रवींद्र चांदेकर - वणीवणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात. अन्यथा त्यांची तोंडे सदैव वेगळ्या दिशांना वळलेली असतात, असा वणीकरांचा अनुभव आहे. त्यातही या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी बाहेरून एखादा ‘तगडा’ उमेदवार पक्षात आणण्यासाठी मोहिमच सुरू केली की काय, असे दिसून येत आहे.महायुतीत वणी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. सन २00४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्वास नांदेकर यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली होती. पहिल्याच झटक्यात ते निवडूनही आले होते. त्यावेळी काँंग्रेस आणि शिवसेनेत थेट लढत झाली होती. त्याचा लाभ नांदेकर यांना मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेने या विधानसभा क्षेत्रात चांगलेच बस्तान बसविले होते ग्रामीण भागात पक्षाने वर्चस्व निर्माण केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातच शिवसेनेची ओहोटीही सुरू झाली. परिणामी सन २00९ मधील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार नांदेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पराभवाला त्यावेळी रिंगणातील तगडे अपक्ष उमेदवारही कारणीभूत ठरले. दरम्यान गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले. नांदेकर यांच्या वर्चस्वाला छेद देत पक्षात काही पदाधिकारी, कार्यकर्ते ‘ताकदवान’ झाले. परिणामी पक्षात गटबाजी सुरू झाली. सध्या या पक्षात कुणीही अन् कितीही काही म्हणत असले, तरी दोन गट कार्यरत आहे. पक्षाची वणी नगरपरिषद, तसेच वणी व मारेगाव पंचायत समितीवर सत्ता आहे. त्यात नगरपरिषदेचे सत्ताधारी एका गटात, तर पंचायत समितीचे सत्ताधारी दुसऱ्या गटात, असे चित्र आहे. भाऊ आणि भैय्या, अशी या पक्षाची वाटणी झाली आहे. एक गट ‘भाऊं’च्या उमेदवारीकडे आस लावून बसला आहे, तर दुसरा गट बाहेरून पक्षात कुणी मातब्बर येतो काय, याची आस लावून बसला आहे. ‘भैय्या’ गटाचा ‘भाऊं’च्या गटाला विरोध आहे. तथापि पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यास दोनही गट अगदी गुण्या-गोविंदाने एकत्र राहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरिष्ठांनाही वणीच्या शिवसेनेत प्रचंड ‘एकी’ असल्याचे वाटत असले, तरी आतून मात्र पक्ष पोखरला जात आहे. शिवसेनेचे सामान्य कार्यकर्तेही या दोन गटात विभाजीत झाले आहे. मात्र या सर्वांमध्ये शिवसेनेचा मतदार एकनिष्ठ आहे. त्यांना भाऊ आणि भैय्या या दोहोंपेक्षा, धनुष्यबाणाचे आकर्षण आहे. त्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला, तरी त्यांना कोणताच फरक पडत नाही. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. नेते केवळ आपल्या स्वार्थासाठी गटातटात विभागले जात आहे. शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असल्याने युतीतील भाजप आणि स्वाभिमानीचे त्यावर बारीक लक्ष आहे. त्यातूनच या दोनही पक्षांनी वणी विधानसभेवर दावा ठोकून शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याने विधानसभा उमेदवारीसाठी प्रचंड चुरस राहणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच दोनही गट कामाला लागले आहेत. सेनेतील अंतर्गत कलहाचा लाभ घेत भाजप आणि स्वाभिमानीने आपला दावा वणीवर ठोकून या दोनही गटाला चपराक लगावली. तरीही किमान येत्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला राहण्याची शक्यता दिसत आहे.