शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

अजून मोठा पल्ला गाठयचाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:12 IST

मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती.

ठळक मुद्देअंजली गायकवाड : आर्णीत बाबा कंबलपोष यात्रेत गायन

हरिओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती.अंजली म्हणाली, मला भविष्यात मोठे गायक व्हायचे आहे. सुगम संगीताची आवड बालपणापासूनच असून वडील या क्षेत्रातील गाढे अभ्यासक असल्याने संगीताचे व गायनाचे बाळकडू मला बालपणी घरीच मिळाले. मी कधी लिटील चॅम्प होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र संगीत क्षेत्रातच करीअर करायचे असून खूप मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही अंजलीने स्पष्ट केले.संगीत क्षेत्रात मोठा टप्पा गाठायचा असून कोणत्याही क्षेत्रात काम करताना कठोर मेहनत व सातत्य हेच यशाचे गमक असल्याचे तिने सांगितले. ही शिकवण घरी बालपणापासून मिळाली असल्याने कोणत्याही क्षेत्रात मुलींनी स्वत:ला कमजोर समजू नये. ज्यात आवड आहे, तेच काम आपण केले पाहिजे. बालवाडीपासून आपल्याला वडिलांनी गायनाचे धडे दिल्याने अवघ्या तेराव्यावर्षी लिटील चॅम्प स्पर्धा जिंकता आली, असेही तिने सांगितले. यावेळी तिचे वडीलसुद्धा उपस्थित होतेमहाराष्ट्रात घराघरात पोहोचल्यावर कसे वाटते, असे विचारल्यावर ती सहजतेने म्हणाली, अद्याप खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी सध्या रियाज सुरू आहे. सोबतच शिक्षणाकडेही लक्ष देत आहे.सेमी इंग्रजीच्या सातव्या इयत्तेत शिकत असून शालेय मैत्रिणीनां वेळ देणे, टीव्ही बघणे, गप्पा मारणे, यात वेळ निघून जात असल्याचे तिने सांगितले. देशभर कार्यक्रम होत असल्याने शिक्षणाकडे बेरचदा दुर्लक्ष होते. अनेकदा आवडीच्या बाबींना मुरड घालावी लागते, असेही तिने नमूद केले.मराठी लावणी, देशभक्तीपर गीतेसर्वधर्मीयांचे दैवत असलेल्या बाबा कंबलपोष यात्रेच्या कार्यक्रमासाठी ती आर्णीत आली होती. सिद्धार्थ खिल्लारे या कलाकारासोबत तिने शुक्रवारी रात्री गायनाचा कार्यक्रम सादर केला. प्रक्षकांनीही तिच्या गायनाला भरभरून दाद दिली. तिने मराठी लावणी, देशभक्तीपर हिंदी गीते सादर करून पेत्रकांची वाहवा मिळविली. सुमारे तीन तास तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.