शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये आता चारशे आॅनलाईन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:09 IST

राज्य शासनाकडून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून ग्रामीण भागातील जनतेला गावातच एकाच छताखाली सर्व योजनेचे लाभ देण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

ठळक मुद्देग्रामीण जनतेला दिलासा : एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : राज्य शासनाकडून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून ग्रामीण भागातील जनतेला गावातच एकाच छताखाली सर्व योजनेचे लाभ देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने ग्रामपंचायतमध्ये स्थापन केलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या सुमारे चारशे सेवा १ नोंव्हेबर पासून देणे सुरु केले आहे.यामुळे ग्रामीण भागातील नागरीक व विद्यार्थी यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सन २०११ पासून राज्यात संग्राम प्रकल्प सुरु करून शासनाने डिजिटल कडे पाऊल टाकले होत. त्यात काम करणाºया कार्यक्षम असलेल्या संगणक परिचालकांनी तुटपुंज्या मानधनावर प्रमाणिक काम करून सलग तीन वर्ष केंद्र सरकारचा ई पंचायत मधील प्रथम पुरस्कार याच संगणक परिचालकानी मिळवून दिला. ग्रामपंचायतीने स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र घेतल्यास त्या केंद्रामध्ये नियमित काम करण्यासाठी एक संगणक परिचालक मिळेल. त्यामुळे गावातील नागरिकांना पाहिजे त्यावेळी सातबारा, आठ अ सह सर्व दाखले मिळतील.जर ग्रामपंचायतींनी एकापेक्षा जास्त गावांमध्ये मिळून एक केंद्र घेतले तर संगणक परिचालक दरदिवशी एकाच गावात हजर राहू शकत नाही. यामुळे नागरिकांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो.मिळणारे दाखलेग्रामपंचायतीचे सर्व लेखे आॅनलाईन करणे, ११ आज्ञावली मध्ये माहिती भरणे, रहिवासी, जन्म-मृत्यू, नाहरकत, बांधकाम परवाना, जागेची नक्कल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र यांसह ३३ प्रकारचे दाखले देण्यात येतात. याबरोबरच महसूल विभागासह इतर विभागाचे सुमारे ४०० पेक्षा जास्त सेवा ग्रामपंचायतींमधूनच उपलब्ध होणार आहे.गरज प्रामाणिक अंमलबजावणीचीग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु या योजनांची प्रामाणिक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मूळ हेतुला शासनातील अधिकारी, कर्मचाºयांकडूनच हरताळ फासल्या जातो. बऱ्याचवेळा तांत्रिक अडथडे येतात. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची योजना राबविण्यासाठी योग्य तयारी असणे गरजेचे आहे. याकडे लक्ष दिल्यास ग्रामीण जनतेला निश्चितच दिलासा मिळू शकेल. अन्यथा हा उपक्रमसुद्धा केवळ कागदांवर राहिल.