सीसीटीव्हीचा आधार : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर यवतमाळ : शहरात झालेल्या विविध घरफोडी प्रकरणातील चोरटे पोलिसांच्या टप्प्यात आले असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून सीसीटीव्ही कॅमेराचाही आधार घेतला जात आहे. शहरात होत असलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले होते. सर्व तपास यंत्रणा या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी गुंतल्या आहेत. श्रीकृष्ण सोसायटीतील घरफोडीच्या गुन्ह्यात असलेले आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. चोरीचा गुन्हा उघड करण्यासाठी गुन्हेगारांकडून मुद्देमाल हस्तगत करणे महत्वाचे आहे. या गुन्ह्यातील मुद्देमाल मिळविण्यासाठीच पोलिसांची धडपड सुरू आहे. गत १५ दिवसांमध्ये झालेल्या घरफोड्यात लाखोंचा ऐवज चोरीस गेला. यामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे. ही रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केल्यानंतरच खऱ्या अर्थाने घरफोडीच्या घटना उघडकीस येणार आहे. त्यासाठी तपास यंत्रणेची धडपस सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
घरफोडीतील चोरटे पोलिसांच्या टप्प्यात
By admin | Updated: August 3, 2015 02:16 IST