शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह दोन महिन्यात होणार पूर्ण

By admin | Updated: July 17, 2016 00:41 IST

येथील बसस्थानक चौकातील नाट्यगृह येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

दीड ‘तप’ उलटले : आतील कामाला आला वेग, कलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ यवतमाळ : येथील बसस्थानक चौकातील नाट्यगृह येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नाट्यगृहाचे काम सुरू होऊन दीड ‘तप’ उलटल्यानंतर आता कुठे ते पूर्णत्वाकडे पोहोचत आहे. जवळपास दीड तपापूर्वी स्थानिक नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक चौक परिसरात नाट्यगृह उभारणीचे काम हाती घेतले होते. शहरातील होतकरू आणि नवोदित गुणी कलावंतांना शहरातच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नाट्यगृहाच्या उभारणीचे काम जोमाने सुरू झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी या नाट्यगृहाचे भूमिपूजन केले होते. या नाट्यगृहामुळे शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नवोदीत कलावंत आणि कला रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. आपल्या शहरातच कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने सर्वच हरखून गेले होते. भूमिपूजनानंतर मात्र अत्यंत संथगतीने या नाट्यगृहाची उभारणी सुरू झाली. वेळोवेळी निधीची कमतरता जाणवू लागली. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे केंद्रात गृहमंत्री म्हणून गेले. तरीही येथील नाट्यगृहाचे काम रखडले. नगरपरिषदेने प्रत्येकवेळी निधीसाठी शासनाकडे तगादा लावला. अनेकदा स्वत:च्या कर मिळकतीतून जुजबी कामे उरकविली. मात्र अद्यापही हे नाट्यगृह पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुणी कलावंतांना अद्यापही आपली कला सादर करण्यासाठी जिल्ह्यात हक्काचे व्यासपीठ मिळू शकले नाही. दरम्यान, नाट्यगृहाच्या कामाने आता पुन्हा चांगलाच वेग धरला आहे. आतील कामे वेगाने सुरू झाली आहेत. परिणामी येत्या दोन महिन्यांत हे नाट्यगृह पूर्णत्वास जाण्याची शक्यता बळावली आहे. दोन महिन्यात खरोखरीच नाट्यगृह पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील नवोदीत व गुणी कलावंतांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसविणार याच नाट्यगृह परिसरात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. अमरावती येथील कारागिरांवर हा अश्वारूढ पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा पुतळाही लवकरच या परिसरात बसविण्यासाठी नगरपरिषदेची तयारी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षाता त्याला आणखी किती वेळ लागेल, याची शाश्वती मात्र कुणीच देऊ शकत नाही.