शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जगण्याचे प्रश्न झाले उदंड.. मरणाचे पीक आले प्रचंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 22:59 IST

संघर्ष करून उच्चशिक्षित झालेले तरुण अजूनही सन्मानजनक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या १७ आत्महत्यांमध्ये अशा तरुणांचेही मोठे प्रमाण आहे. कौटुंबीक कलहांनी महिलांना जगणे मुश्कील केले आहे. त्यातून महिलाही जीवन संपविण्याची मनस्थितीत पोहोचल्याचे आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले तर गंभीर म्हणजे, हसत-खेळत जगण्याच्या वयातील मुलेही आत्मघात करू लागली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेरोजगारी, नापिकी आणि कौटुंबीक कलहांनी जिल्ह्यात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. अनेकांना जगणे कठीण झाले. त्यातून आलेल्या नैराश्याने आता प्रौढांसह अल्पवयीन मुलांनाही घेरले आहे. त्यामुळेच अवघ्या दहा दिवसांत १७ जणांनी आत्महत्या केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.शेती हाच मुख्य आधार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कृषी जीवनच दुर्लक्षित झाले आहे. दरवर्षी होणारी शेतपिकांची नासाडी, नापिकी न्यायाच्या प्रतीक्षेतच राहात आहे. यंदाही हाताशी आलेल्या पिकांना अतिवृष्टीने गारद केले. शेतीसोबत रोजगाराचा आधार देण्यासाठी जिल्ह्यात उद्योगांची वानवा आहे. जे काही रोजगार उपलब्ध आहेत, त्यात स्थैर्य उरलेले नाही. संघर्ष करून उच्चशिक्षित झालेले तरुण अजूनही सन्मानजनक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या १७ आत्महत्यांमध्ये अशा तरुणांचेही मोठे प्रमाण आहे. कौटुंबीक कलहांनी महिलांना जगणे मुश्कील केले आहे. त्यातून महिलाही जीवन संपविण्याची मनस्थितीत पोहोचल्याचे आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले तर गंभीर म्हणजे, हसत-खेळत जगण्याच्या वयातील मुलेही आत्मघात करू लागली आहेत.औदासिन्याने ग्रासलेल्या यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्ग शोधण्याची गरज आहे तर सामाजिक संघटनांनी केवळ निवेदनांचा खेळ करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीशील पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयुष्यात प्रत्येकालाच संकटाला तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत निराश न होता संकटाशी दोन हात करण्याची गरज आहे. आत्महत्येने प्रश्न संपत नाही तर अधिक जटिल होतात. 

दोनोडा येथील इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्याकळंब : विहिरीत उडी घेऊन ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली. बबन मारोतराव निनावे (रा. दोनोडा, ता. कळंब) असे मृताचे नाव आहे. दोनोडा ते खुदावंतपूर रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. दीर्घ आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

दत्तापूर तलावात युवकाची आत्महत्याकळंब : दत्तापूर येथील तलावात उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरुदेव वसंत टेकाम (३२,रा.डोर्ली,ता.यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. एका व्यक्तीने तलावात उडी घेतल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध घेण्यात आला. सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृत गुरुदेव हा मागील काही महिन्यापासून दत्तापूर येथे सासऱ्याकडे राहत होता. तो गवंडी काम करायचा. घरगुती वादातून त्याने तलावात उडी घेतल्याचे सांगितले जाते.

कुठे शेतकरी तर कुठे बेरोजगाराने घेतला गळफास- २७ सप्टेंबर : झाडगाव येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने, तर पुसद येथील ३९ वर्षीय बेरोजगार तरुणाने आत्महत्या केली. - २८ सप्टेंबर : झाडगाव येथील ५३ वर्षीय इसम, यवतमाळ येथील ६३ वर्षीय वृद्ध, पारवा येथील ६५ वर्षीय वृद्ध, वांजरी येथील ३२ वर्षीय युवक, राळेगाव येथील ५३ वर्षीय इसम, घाटंजी येथील ६५ वर्षीय महिला, वणी येथील ३२ वर्षीय मजूर.- ३० सप्टेंबर : सोनखास येथील शेतकरी व बोरी इचोड येथील शेतकरी.- १ ऑक्टोबर : गुंज येथील ४६ वर्षीय पोलीस पाटील.- २ ऑक्टोबर : यवतमाळ येथील ३५ वर्षीय इसम.- ३ ऑक्टोबर : सिंगद येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले.- ५ ऑक्टोबर : आमकिन्ही येथील ५० वर्षीय इसम.- ६ ऑक्टोबर : रोजी जिल्ह्यातील दोनोडा तसेच दत्तापूर येथील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 

भ्रमाचा आजार, डिप्रेशन, भावनांना आवर न घालता येणे या प्रमुख बाबींसह व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. अशा परिस्थितीत परिवारातील व्यक्तींनी मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे असते. मात्र, अशी व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञांकडे जात नाही. सध्याच्या स्थितीत मानसिक आरोग्य सप्ताह सुरू आहे. गावोगावी याची जाणीव जागृती सुरू आहे.- डाॅ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ

मानसिक संतुलन बिघडल्यानंतर नको नको ते विचार डोक्यात येतात. अशा परिस्थिती टोकाचा निर्णय घेतल्या जाण्याचा धोका असतो. त्यातून सावरण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे. योगसाधना करावी. व्यसनाधीनतेपासून दूर जावे. यामुळे मानसिक स्वास्थ्य जपता येईल.- डाॅ. पीयूष बरलोटा, मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी