शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वार्डातून गर्भवतीला हाकलले चक्क उघड्यावर झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:29 IST

डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी मागविण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने  १,६०० रुपये किमतीची रक्ताची बॅग आणली. ही पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही. शुक्रवारी रात्री १० वाजता स्त्रीरोग विभागातील वार्ड क्र. ३ मध्ये पारधी समाजाच्या महिलेला सकाळी चक्क हाकलून दिले. अखेर रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी ८ वाजता या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली. प्रतीक्षा सचिन पवार (२२) रा.बाळेगाव झोंबाडी ता.नेर असे व्यवस्थेची प्रताडणा सहन कराव्या लागणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षाची दुसरी प्रसूती होती. ती पतीसह शुक्रवारी रात्री १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये पोहोचली. तिला वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करून घेतले.  डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी मागविण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने  १,६०० रुपये किमतीची रक्ताची बॅग आणली. ही पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलल्याचा आरोप आहे. रुग्णालय परिसरात सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षाने उघड्यावर गोंडस बाळाला जन्म दिला. 

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील रुग्णांचे हाल - रुग्णसेवक म्हणवून घेणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. प्रतीक्षा पवार हीसुद्धा नेर तालुक्यातील आहे. रुग्णालयातील गैरसुविधांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, येथे कणखर प्रशासक आणि रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे, तरच गोरगरीब रुग्णांना न्याय मिळू शकतो. ही सुविधा देऊ शकत नसेल, तर संजय राठोड यांनी रुग्णसेवक हे बिरुद लावू नये, असा सूर ऐकायला मिळतो.

पतीने कथन केली आपबिती- रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतीक्षाच्या वेदनेची कदर केली नाही. डॉक्टर येथे उपचार करणार नाहीत, याची खात्री पटल्याने नवजात बाळासह ओली बाळंतीण पत्नीला घेऊन आपल्या गावी पोहोचल्याचे सचिनने सांगितले. 

या घटनेची कुठलीही माहिती, तक्रार माझ्याकडे आलेली नाही. या संदर्भात माहिती घेवून चौकशी केली जाईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही करू. असा प्रकार होणे शक्य वाटत नाही. - डाॅ. मिलिंद फुलपाटीलअधिष्ठाता, शासकीय रुग्णालय

 

टॅग्स :Medicalवैद्यकीय