शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. 

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ असते असे म्हणतात. तीच गत मजूर वर्गाची झाली आहे. गावात काम मिळत नाही म्हणून यवतमाळलगतच्या गावातील काही मजूर पहाटेच येथील कामगार चौकात गोळा होतात. आपल्याला रोजगार देण्यासाठी कुणी तरी नक्की येईल म्हणून कामगार  दोन ते तीन तास ताटकळत बसतात. मात्र प्रत्येकांच्या वाट्यालाच रोजंदारी मिळेलच, याचा नेम नसतो. त्यांना दररोजच्या भाकरीची कायम चिंता असते. अनेकांना तर काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावी परत जावे लागते.यवतमाळातील कामगार चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूनम चौक आणि वडगाव नाक्यावर दररोज पहाटेपासून मजुरांची गर्दी पहायला मिळते. सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.   यवतमाळलगतच्या बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा तालुक्यातील मालखेड, सावर, गळव्हा, जवळा, नेर, मंगरूळ, माणिकवाडा, चाणी, कामठवाडा, चिकणी, लिंगा, बोरजई यांसह अनेक गावातून मजूर या ठिकाणी भल्या पहाटेच हजर होतात. पहाटेपासूनच मजुरांची यवतमाळकडे धाव सुरू होते. त्याकरिता प्रत्येक मजूरदार कुटुंबाची पहाटेच धावपळ सुरू होते. दुचाकी, टेम्पो, टॅक्सी, एसटी यांसारख्या वाहनाने कामगार यवतमाळात दाखल होतात. त्यामुळे पहाटेपासूनच सुसाट वेगाने यवतमाळचे रस्ते हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळते. 

आधी गांधी चौक आता पूनम चौक, वडगाव नाकाकामगार चौकाला एक इतिहास आहे. प्रारंभी गांधी चौकात कामगारांची गर्दी होत  होती. आता हे ठिकाण बदलून पूनम चाैक आणि वडगाव नाक्यावर गेले आहे. या दोन्ही ठिकाणी ते गोळा होतात. कारण हेच ठिकाण त्यांच्या घरची चूल पेटविते. मजुरी लागल्यास, चूल पेटते. मजुरी न लागल्यास रिकाम्या हाताने परत जाताना पुन्हा उद्याची चिंता सतावत असते. 

 ठेकेदाराला द्यावे लागते परसेंटेज यवतमाळात येणाऱ्या प्रत्येक मजुराला काम मिळाल्यावर ठेकेदाराला परसेंटेज द्यावे लागते. मात्र, काम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते. त्याची शाश्वती ठेकेदार घेत नाही. अनेक कामगार कामाच्या शोधात दुपारपर्यंत ठाण मांडून बसतात. तोपर्यंत काम न लागल्यास घरी परतात. परतताना चिमुकल्यांसाठी ‘भातकं’ नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी